vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 मद्यविक्री अनुज्ञप्ती राहणार निकाल जाहीर होईपर्यंत बंद

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 मद्यविक्री अनुज्ञप्ती राहणार निकाल जाहीर होईपर्यंत बंद

 

 

 

            जालना, :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 ची मतमोजणी दि. 4 जुन, 2024 रोजी होणार आहे. त्याअनुषंगाने आदेशान्वये दि. 4 जुन, 2024 रोजीच्या आदेशानूसार मतमोजणीच्या दिवशी संपुर्ण जिल्ह्यामध्ये संपुर्ण दिवस कोरडा दिवस जाहीर करण्यात आला होता. तथापि, महेश एस. शेट्टी व नवी मुंबई हॉटेल असोसिएशन यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ मुंबई येथे रिट पिटीशन दाखल केले होते. या रिट पिटीशनमध्ये उच्च न्यायालय, मुंबई यांनी पारित केलेल्या आदेशानूसार या कार्यालयाच्या दि. 3 एप्रिल, 2024 रोजीच्या आदेशामध्ये खालीलप्रमाणे अंशतः बदल करण्यात आला आहे. बदलानूसार दि. 4 जुन, 2024 रोजी जालना लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीचा निवडणुक निकाल जाहीर होईपर्यंत संपुर्ण जालना जिल्ह्यातील अनुज्ञप्त्या बंद राहतील. या आदेशाची जालना जिल्ह्यातील सर्व संबंधित अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी. जे अनुज्ञप्तीधारक या आदेशाची अंमलबजावणी करणार नाहीत किंवा सदर आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 54 (1) (सी) नूसार आवश्यक कारवाई करण्यात येईल. असेही आदेशा‍त नमुद करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन व दुर्बल घटकांसाठी खाटा राखीव ठेवणे बंधनकारक प्रभावी अंमलबजावणीसाठी रुग्णालयांची तपासणी करावी – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल : Rovision Tech Hub Pvt. Ltd. आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील १ लाख ८७ हजार ६५५ विद्यार्थांना पुरविण्यात येणार मोफत पाठ्यपुस्तके …

इकरा अपहरण प्रकरणाच्या उच्चस्तरीय तपासाची खा. कल्याण काळे यांची मागणी,शिष्टमंडळाने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

vishwatmaklokswamivarta

धार्मिक अल्पसंख्यांक शाळांनी अनुदान योजनेसाठी15 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

रोहा तालुक्यातील कोकणवासी ग्रामस्थ शेतकरी, जनता-ग्रामस्थांनी शासकीय योजनाबाबत महत्वाचे ई-केवायसी पूर्तता करुन घ्यावे