vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

विभागीय महिला लोकशाही दिनाचे 10 जून रोजी आयोजन

विभागीय महिला लोकशाही दिनाचे 10 जून रोजी आयोजन

 

 

 

            छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : विभागीय स्तरावरील महिला लोकशाही दिन सोमवारी, 10 जून, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता, विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित करण्यात आला असल्याचे महिला व बाल विकास विभागाच्या उप आयुक्त, हर्षा देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

 

 

 

महिलांच्या तक्रारी तसेच अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणुक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपिठ मिळावे तसेच, त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा या दृष्टीने एक प्रभावी उपाययोजना म्हणून तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागीयस्तर व मंत्रालयीन स्तरावर महिला लोकशाही दिन घेण्यात येत आहे. त्यासाठी तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागीयस्तर व मंत्रालयीन स्तरावर महिला लोकशाही दिन पाळण्याबाबत समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत.

 

 

 

तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथा सोमवार, जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार, विभागीय स्तरावर प्रत्येक महिन्याचा दुसरा सोमवार, तसेच मंत्रालयीन स्तरावर प्रत्येक महिन्याचा पहीला सोमवार लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येतो. अर्जदाराने प्रथमतः तालुकास्तरावर अर्ज दाखल करणे व निराकरण न झाल्यास त्यापुढील जिल्हास्तर, विभागस्तर व मंत्रालयीनस्तर याप्रमाणे अर्ज करणे अपेक्षित आहे.

 

 

 

अर्जाचे नमुन्यासह माहिती महाराष्ट्र शासनाचे www.maharashtra.gov.in या वेबसाईडवर उपलब्ध आहे. महिला लोकशाही दिनात सादर करावयाचे अर्ज महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवस अगोदर विभागीय उपआयुक्त महिला व बाल विकास, छत्रपती संभाजीनगर. ज्युबली पार्क चौक, सिटी सर्व्हे क्र.2974. पॅरामाउंट स्टोअरमागे, जिंदानी लॅबजवळ, छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयात सादर करता येतील.

 

 

 

अर्ज स्विकृतीचे निकष : अर्ज विहीत नमुन्यात असावा. तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. तक्रार अर्ज दोन प्रतित सादर करावा.

 

कोणत्या विषयावरील अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहीत नमुन्यात नसणारी प्रकरणे, आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेला अर्ज तसेच सेवा विषयक आस्थापना विषयक बाबी व 5 तक्रार तसेच निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसले तर अर्ज स्विकारला जाणार नाही.

 

*****

संबंधित पोस्ट

सर्वसमावेशक सल्लागार समिती बैठक महिलांचे हक्क संरक्षण व आर्थिक सक्षमीकरणासाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण..मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी अथकपणे काम करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही,स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना मुख्यमंत्री यांनी केले अभिवादन..

vishwatmaklokswamivarta

पाऊस ओसरताच पंचनामे तात्काळ पूर्ण करा**अतिवृष्टीबाधित मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या**- पालकमंत्री शंभूराज देसाई*

नागरिकांनी थंडीच्या दिवसात योग्य ती दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी 

vishwatmaklokswamivarta

मराठवाड्यातील एकमेव… प्रात्यक्षिक शिक्षण प्रणालीद्वारा-विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित समर कॅम्प* चे आयोजन

भ्रष्टाचारी स्वच्छता निरीक्षकांना पुन्हा जालना मनपात घेऊ नका-विद्रोही पँथर गरीबांच्या संघटनेचे प्रेम जाधव यांची मागणी