vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यातील आरोग्यसेवा कोलमोडणार ?  राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन सुरु..

राज्यातील आरोग्यसेवा कोलमोडणार ?  राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन सुरु…

 

( सुरेश गायकवाड )यास कडून

मुंबई- महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपरिचारिकांनी बेमुदत धरणे आंदोलन करून प्रलंबित असलेली पाठयनिरदेशिका ट्युटर ची पदोन्नती त्वरीत देण्याच्या मागणीसाठी राज्यातील शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या अधीपरीचारिकानी मोठ्या संख्येने दि.10 सोमवार पासून मुंबई येथील आझाद मैदानावर त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलनाला सुरूवात केली असून राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या हजारपेक्षा जास्त परिचारिकांनी पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम पूर्ण केला आहे,२००७ पासून सेवांतर्गत पी.बी.बीएससी.उत्तीर्ण झालेल्या राज्यातील कोणत्याही अधीपरीचारिकाना नियमात तरतूद असतानाही अजूनपर्यंत एकाही परिचारिकेला पदोन्नती दिली नाही.

2007 पासून आज पर्यंत सेवा अंतर्गत पात्र असलेल्या उमेदवारांना डावलण्यात आले आहे आणि अन्यायाची परिसीमा झालेली आहे वीस ते पंचवीस वर्षाची सेवा देऊनही सेवा अंतर्गत पी बी बी एस सी केलेल्या उमेदवारांना पदोन्नती देण्यात आलेली नाही ,

त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेण्यात आलेला नाही. याउलट इंडियन नर्सिंग कौन्सिल आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल यांच्या मार्गदर्शक सूचनांना डावलून महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सरळ सेवेची भरती केलेली आहे 1964 च्या सेवा प्रवेश नियम व 2021 च्या सेवा प्रवेश असे वेगवेगळे सेवा प्रवेश नियम लावून सरळ सेवा भरती केलेली आहे आधीपरिचारिका या पदावर रुजू झाल्यानंतर आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयामध्ये दोन वर्षाचा डिग्री कोर्स पूर्ण केला आहे

शासन सेवेमध्ये त्यांनी शासनाला वीस ते पंचवीस वर्ष सेवा देऊनही त्यांना पदोन्नती न देऊन त्यांच्यावर अन्याय केलेला आहे याबाबत 2007 पासून 2021 पर्यंत रिक्रुटमेंट रुल्स (आर आर) तयार करण्यात आले आणि नवीन आर आर जे तयार झाले ते आंदोलनकर्त्यांवर अन्यायकारक असे आहेत त्यामुळे पाठ्यनिर्देशिका पद (ट्यूटर ) पदोन्नतीने भरण्यात आलेले नाही हा अन्याय दूर करण्याकरिता अनेक वेळा शासनास सार्वजनिक आरोग्य विभागास पाठपुरावा केला. अनेकदा आंदोलने केली. परंतु त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही त्यामुळे आंदोलनकर्त्यांवर बेमुदत धरणे आंदोलनाची वेळ आली आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील अधीपरीचरिका आपल्या कुटुंबातील लहान मुलांसह मुंबईत दाखल झाल्या आहेत.

संबंधित पोस्ट

नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया  रामदास आठवले यांच्या पक्षाला दोन विजय

परतीच्या पाऊसामुळे होणाऱ्या आपत्तीसाठी सर्तकतेचा इशारा..

vishwatmaklokswamivarta

उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीची विद्यार्थी, पालक व संस्था प्रतिनिधींशी मंत्री चंद्रकांत पाटील साधणार संवाद महिती देण्यासाठी ऑनलाइन वेबिनारचे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 11 :30 वा करणार ‘मन की बात’, ‘या’ मुद्द्यांवर करू शकतात चर्चा

vishwatmaklokswamivarta

जळगाव जिल्ह्यातील पाच तालुके डी+ करण्यास तत्वतः मंजुरी- उद्योग मंत्री उदय सामंत

रशिया युक्रेन युद्ध :युक्रेनमधून परतलेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! आयोगाने जारी केली सूचना