vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याव्यवसाय

शामराव पेजे इतर मागसवर्गीय महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

शामराव पेजे इतर मागसवर्गीय महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

 

 

ठाणे, दि.12 (जिमाका) :- शामराव पेजे इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. ठाणे यांच्यामार्फत इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरीता पुढील प्रमाणे शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक निशिकांत नार्वेकर यांनी केले आहे.

 

योजनेचा उद्देश व स्वरूप – इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरीता बँकेमार्फत मंजूर केलेल्या रू.20.00 लक्ष पर्यंत कर्ज रकमेवरील व्याज परतावा (कमाल 12 टक्केपर्यंत) महामंडळाकडून वितरीत केला जाईल.

 

1. राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी – महत्तम कर्ज मर्यादा रू.10.00 लक्ष पर्यंत.

 

2. परदेशातंर्गत (Foreign) अभ्यासक्रमासाठी – महत्तम कर्ज मर्यादा रू.20.00 लक्ष पर्यंत.

 

लाभार्थी पात्रतेच्या अटी व शर्ती –

 

1. अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्षे असावे.

 

2. अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील असणे तसेच तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

 

3. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरीता रू.8.00 लक्ष पर्यंत असावी.

 

4. अर्जदार हा इयत्ता 12 वी 60% गुणांसह उत्तीर्ण असावा तसेच पदवीच्या व्दितीय वर्षे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60% गुणांसह पदविका (Diploma) उत्तीर्ण असणे आवश्यक.

 

5.अर्जदाराचा सिबील क्रेडीट स्कोअर 0, -1 (म्हणजेच यापूर्वी त्याने कर्ज घेतलेले नसावे) किंवा किमान 500 पेक्षा जास्त असावा.

 

कर्ज प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे-

 

1.अर्जदाराचा इतर मागास प्रवर्गातील (OBC) जातीचा दाखला.

 

2. रू.8.00 लक्ष पर्यंतचा उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार कार्यालयाकडून निर्गमित केलेला)

 

3. महाराष्ट्र रहिवासी (वय अधिवास) दाखला (तहसिलदार कार्यालयाकडून निर्गमित केलेला)

 

4.अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे आधार कार्ड

 

5. अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे पासपोर्ट फोटो

 

6. शैक्षणिक कर्ज आवश्यक आहे त्या अभ्यासक्रमासाठीची पात्रता परिक्षा उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका.

 

7.अर्जदाराचा जन्माचा / वयाचा पुरावा

 

8.शैक्षणिक शुल्क संबधित संस्थेचे पत्र.

 

9.आधार संलग्न बँक खाते पुरावा.

 

10.मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा.

 

11.शिष्यवृत्ती (Scholarship), शैक्षणिक शुल्कमाफी (Free ship), पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र.

 

12. तसेच इतर आवश्यक कागदपत्रे.

 

अधिक माहितीसाठी महामंडळाचा पत्ता व संपर्क :- शामराव पेजे इतर मागसवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. ठाणे, डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन कळवा, ठाणे 2 रा मजला , दत्तवाडी स्वामी समर्थ मठासमोर, सह्याद्री शाळेच्या बाजुला खारेगांव, कळवा, ठाणे – 400605. भ्रमणध्वनी क्र.9869281787, 9226090909, 8793576503, इमेल:- dmobcthane@gmail.com / www.msobcfdc.org.

 

ही योजना पूर्णपणे ऑनलाईन असून ज्या उमेदवारांना शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी आपले अर्ज महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावरून करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाच्या वरील पत्यावर अथवा महामंडळाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे ठाणे जिल्हा व्यवस्थापक निशिकांत नार्वेकर यांनी कळविले आहे.

 

0000000

संबंधित पोस्ट

प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

vishwatmaklokswamivarta

विशेष वृत्तः- गणेश मुर्ती विक्रीतून ‘लखपती दिदी’चा‘श्री गणेशा’; भाविकांनी केली ९० हजार मुर्ती खरेदी

vishwatmaklokswamivarta

नव्या दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना

vishwatmaklokswamivarta

जनतेला सुलभ महसूल सेवा उपलब्ध करुन द्या – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे महसूल विभागातील विविध योजनांचा आढावा

vishwatmaklokswamivarta

मतदानाबाबत जनजागृती,जिल्हाधिकारी कार्यालयाचा बाहेरील व अंतर्गत भाग मतदानाच्या जनजागृतीचे आकर्षक पोस्टर व गोल पताका लावून सजवण्यात आला आहे. जालना लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 13 मे रोजी मतदान होणार आहे.

जालना जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी उद्योजकांना जिल्हा प्रशासनाचे सर्व सहकार्य– जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ