vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नव्या दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना

नव्या दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

दिल्ली,: ढोल-ताशांवरील ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषाने कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदन आज दुमदुमले. लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी गणेशभक्तांनी एकच गर्दी केली . गणरायाच्या आगमनासाठी असेच जल्लोषपूर्ण व भक्तिमय वातावरण संपूर्ण दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दिसून आले.

 

महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आज गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच दिल्लीच्या वेगवेगळया भागातील विविध गणेश मंडळांतही उत्साहाच्या वातावरणात आज गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

 

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आनंद व उत्साहाच्या वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव महाराष्ट्राबाहेर राजधानी दिल्लीतही उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्र सदनात सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने आयोजित गणेशोत्सवात महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांनी गणरायाची पूजा केली. सहायक निवासी आयुक्त श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, गणेशभक्त यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

तत्पूर्वी, आज सकाळी येथील कोपर्निकस मार्गावर जल्लोषात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’ या घोषणा, ढोल ताशांचा गजरामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. मिरवणुकीनंतर शासकीय पूजा, मंत्रोच्चार व श्रींची आरती होऊन गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

 

दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील जवळपास ३८ मराठी गणेशोत्सव मंडळातही आज गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष सर्वत्र साजरा करण्यात आला.

संबंधित पोस्ट

ऑपरेशन सद्भावना” लोकशाही बळकट करणारा उपक्रम- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन· सिक्कीमच्या विद्यार्थ्यांचा राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्यासोबत संवाद

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांना देणार भेट

ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकर, ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरासह जिल्ह्यात ७१ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू !

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २८ एप्रिल व १९ मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली..

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024-विधानसभा मतदार संघासाठी 2 उमेदवारांचे 3 अर्ज दाखल आजपर्यंत 158 उमेदवारांना 403 नामनिर्देशन अर्जाचे वितरण

vishwatmaklokswamivarta

अवकाळीग्रस्त भागाला सर्व पालकमंत्री भेट देणार,सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित सादर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta