vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेशव्यवसाय

खामगाव, मलकापूर येथे करिअर शिबीर

खामगाव, मलकापूर येथे करिअर शिबीर

 

बुलडाणा,  खामगाव आणि मलकापूर येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर गुरूवार, दि. 20 जून रोजी आयोजित करण्यात आले आहे.औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खामगावच्या वतीने खामगव येथील कोल्हटकर स्मारक मंदिर, केला हिन्दी शाळेच्या मागे येथे सकाळी ११ वाजता शिबिर घेण्यात येणार आहे. आमदार अॅड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन होईल. या शिबीरास जिल्हा, तालुक्यातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य एस. डी. गंगावणे यांनी केले आहे.

 

नांदुरा आणि मलकापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने गुरूवार, दि. 20 जून 2024 रोजी सकाळी 10 वाजता करिअर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार राजेश एकडे उद्घाटक म्हणून उपस्थित राहतील. करीअर मार्गदर्शक सचिन वारूळकार मार्गदर्शन करतील. यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

00000

 

लोणार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया

 

बुलडाणा,  : लोणार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत यावर्षीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

यावर्षीची प्रवेश प्रक्रिया ३ जूनपासून ऑनलाईन स्वरुपात सुरु झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक संचालनालयाचे संकेतस्तळ admission.dvet.gov.in जाहीर केले आहे. यंदा प्रवेश अर्ज व नोंदणी शुल्क भरणे, आयटीआय केंद्राची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा, दुरुस्ती करणे, हरकती नोंदविणे आदी सर्व कामे विद्यार्थ्यांना ऑनलाईन करता येणार आहेत. ही सर्व कामे आयटीआयमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना माफक दरात करून मिळतील.

 

यावर्षी प्रवेशासाठी लोणार आयटीआयमध्ये ५ व्यवसाय उपलब्ध आहेत. यात ड्रेस मेकिंग, कोपा, वायरमन, फिटर, वूड वर्क टेकनिशियन हे व्यवसाय प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यावर्षी लोणार आयटीआय मध्ये ऐकून १०८ जागांसाठी प्रवेश होणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना मूळ कागदपत्रे सादर करून आपला प्रवेश निश्चित करावा. अर्ज भरल्यानंतर प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी नजीकच्या कोणत्याही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपस्थित राहून अर्ज निश्चित करता येणार आहे. त्या विद्यार्थ्याचा प्रवेश संदर्भातील पाठपुरावा त्या आयटीआयची यंत्रणा करणार आहे.

 

प्रवेशासाठी विद्यार्थ्याना नोंदविलेला दूरध्वनी क्रमांक आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत तोच ठेवावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना केंद्राच्या संकेतस्थळावर माहिती अपलोड करताना हा मोबाईल क्रमांक लॉगीन असणार आहे. त्यामुळे हॉल तिकीट, परीक्षा विषयक माहिती, तसेच अंतिम प्रमाणपत्र प्राप्त करणे यासाठी आवश्यक असणार आहे. यामुळे हा दूरध्वनी क्रमांक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत सुरु ठेवणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे हा दूरध्वनी क्रमांक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत सुरु ठेवणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे अर्जावर काळजी पूर्वक मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे. प्रशिक्षणार्थ्याना उत्पनाच्या आधारे दरमहा ५०० रुपये विद्यावेतन मिळणार आहे. प्रवेशासंदर्भातील माहितीसाठी ९७६६७६२८९८, ९७६५०२७३७६, ९८२३३१४८७२, ७८७५०८९०११, ७४४७४५२९५८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

सिडको प्रदर्शनी केंद्रातील बॉयलर इंडिया 2024 चे उद्गघाटनप्रदर्शनात 260 पेक्षा अधिक उद्योजकांचा समावेश

vishwatmaklokswamivarta

राज्यपालांची वझ्झर अनाथ आश्रमास भेट

vishwatmaklokswamivarta

शेतीवर आधारित उपप्रकल्प करावेत*-माविम व्यवस्थापकीय संचालक राजलक्ष्मी शाह मुंबई*

नवरात्रात दोन हजार कार आणि पाच हजार दुचाकींचे बुकिंग, दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांची गाडी…

vishwatmaklokswamivarta

शिक्षकांच्या निवृत्ती वेतन योजनेत सुधारणेविषयी निर्णय लवकरच– उद्योग मंत्री उदय सामंत

सैय्यद लायकोद्दीन यांची रा.काँ शरद पवार पक्ष अल्पसंख्यांक विभागाचे औरंगाबाद जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती.