vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

कबड्डीला प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रीय क्रीडा संहितेनुसार राज्य कबड्डी असोसिएशन कार्यकारिणी निवडणूक घेण्याची सूचना

कबड्डीला प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रीय क्रीडा संहितेनुसार राज्य कबड्डी असोसिएशन कार्यकारिणी निवडणूक घेण्याची सूचना

 

 

 

मुंबई, दि. 18 : राष्ट्रीय क्रीडा संहितेचे राज्य कबड्डी असोसिएशन कार्यकारिणीने तंतोतंत पालन करावे आणि त्यानुसार राज्यस्तरीय निवडणूक पार पाडावी. तसेच कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिल्या. महाराष्ट्रात कबड्डी खेळ रूजवावा – वाढवावा यासाठी प्रयत्न करावे. कबड्डीला प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन सल्लागार समिती व कार्यकारिणीची बैठक आज दादर शिवाजी पार्क येथील कबड्डीमहर्षी शंकरराव साळवी सभागृहात अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. असोसिएशनचे उपाध्यक्ष आमदार भाई जगताप, माजी आमदार अमरसिंह पंडित, दिनकर पाटील, उपाध्यक्ष शकुंतला खटावकर, सहकार्यवाह बाबुराव चांदेरे, खजिनदार मंगल पांडे, सहकार्यवाह रविंद्र देसाई, असोसिएशनचे आजीव सदस्य अविनाश सोलवट यांच्यासह कार्यकारिणी सदस्य आणि असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.

 

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, कबड्डी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिसांची रक्कम वाढविण्यात आली आहेत. राज्यात खेळ संस्कृतीला महत्व प्राप्त व्हावे यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. ग्रामीण भागात कबड्डी जास्त रूजली आणि वाढली असल्याने आमदार निधी, जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिला जातो. कबड्डी खेळाला पूर्वीचे दिवस आणण्यासाठी असोसिएशनमार्फत प्रयत्न करायला हवेत. राष्ट्रीय संहितेनुसार कार्यकारिणी निवडणूक घेण्यात यावी. तसेच स्पोर्ट्स कोडचे पालन करण्यात यावे. २१ जून रोजी नव्याने होणाऱ्या कार्यकारिणीसाठी निवडणूक होणार असून, १९ जून ही जिल्हानिहाय मतदारांची नावे स्विकारण्याची अंतिम तारीख असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

०००

संबंधित पोस्ट

गणेशोत्सवात राज्यात नाईट कर्फ्यू लागण्याची शक्यता

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीला न जाता थेट बंगळुरुमध्ये जाणार, इस्रोच्या शास्त्रज्ञांची घेणार भेट ….

दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे* *शासनाचे धोरण- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे* *पाटील*

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजनेसाठीअर्ज दाखल करण्यास मुदतवाढ महिलांनी एजंट अथवा दलालापासून सावध राहावेअर्ज दाखल करण्यासाठी गर्दी करु नये प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल गैरप्रकार आढळल्यास प्रशासनाला तात्काळ कळवावे– जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

vishwatmaklokswamivarta

भव्य दिव्य अयोध्येच्या राम मंदिर उद्द्घाटनाचा आपलाआनंद ,13 हजार फूटावरून स्कायडायव्हिंग करत ‘जय श्री राम’ चा झेंडा फडवत केला  व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल .. 

vishwatmaklokswamivarta

शिळफाटा येथील महिलेवर सामूहिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,दोषींना कठोरात कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणार; विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी..

vishwatmaklokswamivarta