
सर्वसामान्यांना आधार देऊन अडचणीत धावून येतो तोच खरा शिवसैनिक समर्पित भावनेने जनतेची कामे करा : जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर
जालना, (प्रतिनिधी)-शिवसेनेचा आज ५८ वा वर्धापन जालना जिल्ह्यात रक्तदान व सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर, माजी जि.प. अध्यक्षअनिरुद्ध खोतकर, डॉ.राजेश राऊत, शहरप्रमुख घनश्याम खाकीवाले, दुर्गेशकाठोठीवाले, माजी नगरसेवक विजय पवार, बळीराम ढवळे,आयोजक दलित आघडीचेशहरप्रमुख संजय रत्नपारखे, गांगुताई वानखेडे आदींची प्रमुख उपस्थिती
होती. जालना शहरातील शिवसेना भवन येथे दलित आघाडीच्या वतीने आयोजित
करण्यात आलेल्या रक्तदान कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी पदाधिकारी व शिवसैनिकांना उद्देशून बोलतांना जिल्हाप्रमुख
भास्करराव अंबेकर म्हणाले की, सामान्यांच्या अडचणीमध्ये व सुखदुःखात
धावून येणारा जनतेची सेवा करणाराच खरा शिवसैनिक आहे. शेतकरी, कामगार,
शेतमजूर व सर्व सामान्य नागरिकांची सेवा हेच खरे पक्षाचे ध्येय आहे. अशा
या कार्यशाळेत बाळासाहेबांमुळे आम्ही तयार झालो. सामान्यांसाठी झटतो. आज
राजकारण गढूळ झाल्याने ते पैशा भोवती फिरत असल्याचे दिसते. बाळासाहेबांना
नेहमी सामान्यांची सेवा अपेक्षित होती. त्यामुळेच ते २० टक्के राजकारण व
८० टक्के समाजकारण करा असे सातत्याने शिवसैनिकांना सांगायचे. शिवसेनेमुळे
सामान्य व्यक्ती जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष, आमदार, खासदार व
मंत्री पदापर्यंत पोहोचला. सामान्य माणसाला शिवसेना अत्यंत जवळचा वाटणारा
पक्ष आहे.
अनेक वेळा निवडून आलेल्या काही लोकांनी मात्र पक्षाशी श्वासघात केला. आज
शिवसेना पक्ष ५८ वर्षांचा झाला पण आजही शिवसेनिक ताठ मानेने उभाआहे
त्यामुळे घराघरात शिवसेना पक्ष न्या जनतेची सेवा करा, असेही अंबेकर
म्हणाले. यावेळी रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. यावेळी
संदीप मगर, बंडू केळकर, जीवन खंडागळे, किशोर नरवडे, बळीराम तिडके, संतोष
क्षत्रिय, सोनाजी खांडेभराड, रामेश्वर कूरिल, शिवसैनिक, पदाधिकारी व
जालना ब्लड बँकेचे कर्मचारी यांची उपस्थिती होती.



