vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी दुर्गराज रायगड येथे कार्यक्रमांचे आयोजन**जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केली पाहणी 

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी दुर्गराज रायगड येथे कार्यक्रमांचे आयोजन**जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केली पाहणी

 

रायगड प्रतिनिधी:- शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाचे आयोजन दुर्गराज रायगड येथे 20 जून रोजी होत असून रायगड जिल्हा प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी केली आहे. जिल्हा प्रशासनासह विविध शासकीय विभाग सुविधा पुरविण्यासाठी कार्यरत असून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घागें, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांनी भेट देऊन पूर्वतयारीची पाहणी केली.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते,

रायगड किल्ला व परिसरात होत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांना सोई सुविधा निर्माण करताना आवश्यक काळजी घेण्यात आली आहे. वाहनांचे पार्किंग, पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता तसेच या कालावधीत आवश्यक असणाऱ्या विविध सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी विविध व्यवस्था करताना सोहळ्याच्या दिवशी शिवभक्तांसाठी बससेवा महाड ते पाचाड या दरम्यान सुरू करण्यात आली आहे. तसेच खासगी वाहनांच्या पार्किंग ठिकाणापासून देखील बससेवा उपलब्ध आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण गडाच्या चित्त दरवाजाजवळील वाय पॉईंट, बसपार्किंग आणि गडावर विविध ठिकाणी उभारलेल्या पाच भव्य स्क्रीन वर करण्यात येणार असून शिवप्रेमी नागरिकाना या परिसरातून पाहता येईल.

 

00000

संबंधित पोस्ट

_हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे प्रसिद्धीपत्रक_ *‘लाडक्या बहिणीं’च्या सुरक्षेसाठी आधी ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करा ! – दादर येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात मागणी*

आता फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी आहे; नितेश राणे यांचा शिवसेनेला टोला

vishwatmaklokswamivarta

जिल्हा प्रशासनाचे शून्य प्रलंबितता अभियान;कालबद्ध कार्यक्रमाची अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

पंपिंग स्टेशन विद्युत पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्याने, संपूर्ण मुंबईला पाणीपुरवठा होऊ शकणार नाही, जल अभियंता,मुंबई महानगरपालिका

कर्जबुडव्या उद्योगपती विजय मल्ल्या याचा समावेश असलेल्या न्यायालयीन अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पुढील वर्षी अठरा जानेवारी रोजी अंतिम सुनावणीआता आणखी काळ वाट पाहता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

vishwatmaklokswamivarta

भारतीय लष्कराकडून आज 76 वा पायदळ दिन साजरा करण्यात आला आहे

vishwatmaklokswamivarta