vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पंपिंग स्टेशन विद्युत पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्याने, संपूर्ण मुंबईला पाणीपुरवठा होऊ शकणार नाही, जल अभियंता,मुंबई महानगरपालिका

मुंबईला पाणी शुद्ध करुन पुरवठा केल्या जाणाऱ्या भांडुप संकुलात मुसळधार पावसामुळे पाणी साचले आहे. त्यामुळे पंपिंग स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, मुंबईत रविवारी पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. पाणी साचल्याने येथील पम्प बंद पडले आहेत. त्यामुळे तेथील पाण्याचा निचरा केल्याशिवाय पंप दुरुस्तीचे काम करता येणार नसल्याने, संपूर्ण मुंबईचा पाणीपुरवठा बंद रविवारी राहणार आहे.

पंपिंग स्टेशनमध्ये शिरले पाणी

मुंबईला ज्या धरणांतून पाण्याचा पुरवठा केला जातो, त्या सर्व धरणांतील पाण्याचे शुद्धीकरण भांडुप संकुलात करुन पुढे मुंबईकरांना पुरवठा केले जाते. मुंबईला दरदिवशी ३८०० दशलक्ष लिटर अर्थात ३८० कोटी लिटर पण्याचा पुरवठा केला जातो. पण रात्रीपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाची भांडुप संकुल परिसरात अधिक नोंद झाली. त्यामुळे हे संकुल पाण्याखाली गेले असून, पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरले आहे. हे पाणी उपसण्याचे काम सध्या सुरू आहे.

…तर होणार उशिरा पाणीपुरवठा

महापलिका जल अभियंता व उपायुक्त (अभियांत्रिकी विभाग) अजय राठोर यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी या भागात पाणी साचल्याने तसेच पंपिंग स्टेशन विद्युत पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्याने, संपूर्ण मुंबईला पाणीपुरवठा होऊ शकणार नाही, असे सांगितले. सध्या पाणी उपसण्याचे काम सुरू आहे, ते झाल्यानंतर पंप सुरू केले जातील. जर हे काम लवकर झाल्यास उशिरा मुंबईला पाणीपुरवठा केला जाईल, असे स्पष्ट केले.

संबंधित पोस्ट

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर झाला

vishwatmaklokswamivarta

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारांतर्गत नऊ जिल्ह्यांतील पाच हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे प्रशिक्षण मिळणार

vishwatmaklokswamivarta

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक प्रशिक्षणाचे नियोजन प्राधान्याने करा – मंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू सर्व यंत्रणांनी नियोजनबद्ध व काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदासाठी,पूर्वप्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिगिट मॅक्रॉन यांचे आज तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी मुंबईत आगमन