
राज्यशासनाचा अतिरीक्त अर्थसंकल्प म्हणजे महायुतीचाकधीही पूर्ण न होणारा निवडणूक जाहीरनामा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
लातुर प्रतिनिधी : महारा्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यशासनाकडूनअतिरीक्त अर्थसंकल्प सादर करतांना आश्वासनांचा मुसळधार पाऊस पाडला गेलाआहे. ही आश्वासने कधी आणि कशी पूर्ण होणार यांचे कोणतेही नियोजन दिलेलेनाही त्यामुळे हा अर्थसंकल्प म्हणजे महायुतीचा निवडणूक जाहीरानामाचअसल्याची प्रतिक्रीया राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य
मंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
व्यक्त केली आहे.
पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार
यांनी आज शुक्रवार २८ जून रोजी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला.
या संदर्भात प्रतिक्रीया व्यक्त करतांना माजी मंत्री आमदार अमित विलासराव
देशमुख यांनी म्हटले आहे की, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत
महायुतीला राज्यात चांगलाच फटका बसला. शेतकरी, कामगार, महीला, अदिवासी
सर्व समाज घटक सरकारवर नाराज असल्याचे निवडणूक निकालातून दिसून आले आहे.
या घटकांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या समस्या समजून घेऊन त्या
सोडविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्या ऐवजी तात्कालीक घोषणा करण्यावर
महायुती सराकरने भर दिल्याचे दिसून येत आहे. मागच्या वर्षीच्या
अर्थसंकल्पात अशाच प्रकारे केलेल्या घोषणांची प्रतिपूर्ती झालेली
नसल्याने नव्या घोषणावर राज्यातील जनता आता विश्वास ठेवणार नाही, हे
स्पष्ट दिसून येत आहे.
येत्या काही दिवसात राज्यात विधानसभेच्या निवडणूका होत आहेत. लोकसभा
निवडणूकीप्रमाणेच मतहायुतीलाही येणाऱ्या निवडणूकीतही फटका बसणार याची
जाणीव झाल्यामुळे या अर्थसंकल्पात शेतकरी, कष्टकरी जनता, महीला यांच्या
संदर्भाने अनेक पोकळ घोषणा करण्यात आल्याचे दिसून आले आहे. प्रचंड महागाई
वाढलेली असतांना शासनाकडून मागच्या काळात कोणत्याही उपाययोजना आखण्यात
आल्या नाहीत, शेतीमालाचे भाव वाढविण्यासाठी कोणताही धोरणात्मक निर्णय
झाला नाही. विम्याच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या ऐवजी विमा कंपनीचे हित
पाहीले गेले. तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगारवाढीचे प्रयत्न
केले गेले नाहीत उलट महारा्ट्रातील उदयोग गुजरातला पाठवीले आहेत.
निवडणूका जवळ आल्यानंतर आता घोषणांचा मुसळधार पाऊस पाडून जनतेला
भूलवण्याचे प्रयत्न होत आहेत, मात्र आता जनता महायुतीच्या कोणत्याही
भुलथापांना बळी पडणार नाही, असेही आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे.



