vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याबद्दल भगिनींनी मानले मुख्यमंत्री भाऊरायाचे आभार भगिनींनी बांधल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राखी; महिलांसाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीची मुख्यमंत्र्यांकडून ओवाळणी

राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याबद्दल भगिनींनी मानले मुख्यमंत्री भाऊरायाचे आभार

भगिनींनी बांधल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राखी; महिलांसाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीची मुख्यमंत्र्यांकडून ओवाळणी…

 

 

राज्य प्रतिनिधी- राज्याच्या अर्थसंकल्पात महिला- भगिनींसाठी अनेक निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रातील महिला- भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळून राखी बांधत त्यांचे आभार मानले. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी १ जुलैपासून करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांना अनोखी ओवाळणी दिली.

 

विधानभवनाच्या प्रांगणात आज विविध क्षेत्रातील महिला भगिनी एकत्र जमल्या होत्या. विधिमंडळात काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक निर्णय घेण्यात आले. या निर्णयामुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळाल्याने त्यांनी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांना ओवाळून राखी बांधून त्यांचे आभार मानले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, अर्थसंकल्पात राज्यातील महिला- भगिनींना दिलासा देणारे अनेक निर्णय आम्ही घेतले आहेत. मुख्यमंत्री माझी बहिण योजनेचा शासन निर्णयदेखील तातडीने काढण्यात आला असून त्याचा लाभ येत्या 1 जुलैपासून भगिनींना देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. या निर्णयाचा फायदा अडीच कोटींहून जास्त महिलांना होणार आहे.

 

महिलांना वर्षातून 3 सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाही सुरू करण्यात येणार आहे. तसेच 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. बचतगटांतील महिलांचे खेळते भांडवल 15 हजारावरून वाढवून 30 हजार केले आहे. मुलींना उच्च शिक्षणापर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचा, 10 हजार महिलांना पिंक रिक्षांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महिलांना मोफत प्रवास, 50 टक्क्यांपर्यंत मोफत एसटी प्रवास यापूर्वीच दिलेला आहे, राज्यातील सर्व माता-भगिनींच्या पाठीशी त्यांचा मुख्यमंत्री भाऊराया म्हणून नेहमी पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. राखी बांधल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्व भगिनींचे आभार मानले.

संबंधित पोस्ट

मुंबई गोवा महामार्गावर आरामबस उलटून 4 ठार, 23 जखमी; एकाच रस्त्यावर दिवसातील दुसरी घटना

vishwatmaklokswamivarta

लाडक्या बहिणींना डिसेंबर माहिन्याचा हफ्ता लवकरच मिळणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर हे पैसे बहिणींच्या खात्यात टाकण्यास सुरूवात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

vishwatmaklokswamivarta

एसटी संपाबाबत महत्वाची बातमी, विलीनीकरण अहवालावर 22 फेब्रुवारीला सुनावणी…

vishwatmaklokswamivarta

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून पद व गोपनीयतेची शपथ

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव, मोहरम, दहीहंडी अशा सर्व सणांवरील निर्बंध शिंदे-फडणवीस सरकारने हटवले

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुलढाणा शहरातील संत-महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण;संत आणि महापुरुषांची स्मारके प्रेरणा व उर्जा देणारे ठरतील

vishwatmaklokswamivarta