vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबई गोवा महामार्गावर आरामबस उलटून 4 ठार, 23 जखमी; एकाच रस्त्यावर दिवसातील दुसरी घटना

मुंबई गोवा महामार्गावर आरामबस उलटून 4 ठार, 23 जखमी; एकाच रस्त्यावर दिवसातील दुसरी घटना…

 

मुंबई कोकण प्रतिनिधी

. मुंबई गोवा महामार्गावर आज 13 लोकांना प्राण गमवावे लागले. सिंधुदुर्गातील कणकवली येथे अरामबस उलटून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तर 23 जण जखमी झाले. कणकवली येथे वागदे पुलानजीक ही घटना घडली.

मुंबई गोवा महामार्गावर आज 13 लोकांना प्राण गमवावे लागले. सिंधुदुर्गातील कणकवली (Kankavli Accident) येथे अरामबस उलटून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तर 23 जण जखमी झाले. कणकवली येथे वागदे पुलानजीक ही घटना घडली. आज दिवसभरात घडलेली ही दुसरी घटना आहे. मुंबई गोवा महामार्ग आज पहाटे रायगडजवळही एक अपघात घडला. या अपघातात 9 जणांना आपले प्रपाण गमवावे लागले.

माहितीनुसार, पहाटे 4 वाजणेच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातग्रस्त झालेली आरामबस खासगी मालकीची होती. गडनदी पूलावर आल्यावर चालकाचे बसवरील नियंत्रण सूटले. त्यामुळे हा अपघात घडला. अपघातग्रस्त झालेली आरामबस 36 प्रवाशांना घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघाली होती. अपघाताची माहिती कळताच स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. तसेच, तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरु केले.जखमींना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

दरम्यान, मुंबई गोवा महामार्गावर रायगड जवळील रेपोली गावानजिक झालेल्या अपघातात 9 जण ठार झाले. तर एक जण जखमी झाला. जखमीमध्ये 4 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. इको कार आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला. अपघातामध्ये इको कारमधील 9 जण ठार झाले. 4 वर्षांचे मूल मात्र धक्कादायकरित्या बचावले. त्याच्यावर माणगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

 

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद व पंचायत समितीनिवडणूक-2026 मतदानाच्या दिवशी आठवडा बाजारांना पूर्णवेळ बंदी..

vishwatmaklokswamivarta

शहरातील विकास कामे 1 जूनपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश; हलगर्जीपणा केल्यास संबंधित अधिकारी, कंत्राटदार यांच्यावर होणार कारवाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आपलं मंत्रालय’ विशेषांकाचे प्रकाशन

मराठी पाट्यांच्या निर्णयावर टीका करताना भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन टीका केली त्याला  – महापौर चे पेडणेकर उत्तर

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकार, प्रयत्नांमुळेरायगडच्या रोहा एमआयडीसीत ‘सीट्रिपलआयटी’ मंजूरटाटा टेक्नॉलॉजी’कडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्ररायगडच्या रोहा एमआयडीसीत १०५ कोटी रुपये खर्चाची सीट्रिपलआयटी’ मंजूर, दरवर्षी हजारो युवकांना प्रशिक्षण…

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय संचार ब्युरोच्या तीन दिवसीय मतदार जनजागृती चित्रप्रदर्शनास प्रारंभ,मतदानाची प्रेरणा जागविण्यास चित्रप्रदर्शन उपयुक्त- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी