vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्हा सांख्यिकी कार्यालयात राष्ट्रीय सांख्यिकी दिन उत्साहात साजरा

जिल्हा सांख्यिकी कार्यालयात राष्ट्रीय सांख्यिकी दिन उत्साहात साजरा

 

 

 

जालना, प्रतिनिधी :- भारतीय संख्याशास्त्राचे जनक प्रा. प्रशांत चंद्रमहालनोबीस यांचा जन्म दिन दि.29 जून हा “राष्ट्रीय सांख्यिकी दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने जालना येथील जिल्हा सांख्यिकी कार्यालयात दि.29 जून, 2024 रोजी राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा करण्यात आला. यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना “Use of Data in Decision Making” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात येवून राष्ट्रीय सांख्यिकी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

 

यावेळी सर्वप्रथम प्रा.पी.सी.महालनोबीस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी हे होते. बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. एस. एन. कांबळे, व नायब तहसिलदार दिलीप सोनवणे हे प्रमुख अतिथी उपस्थित होते. यावेळी उपसंचालक कुंदन कांबळे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी उपस्थित होते.

 

याप्रसंगी सर्वप्रथम नायब तहसिलदार श्री. सोनवणे यांनी विविध क्षेत्रातील सांख्यिकीचे महत्व व महालनोबीस यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला. निर्णय प्रक्रियेसाठी आकडेवारीचे महत्व अधोरेखित केले. तर अर्थ व सांख्यिकी संचालनालय ही राज्यशासनाची प्रमुख सांख्यिकीय संस्था म्हणून कार्यरत असून संचालनालयास राज्यातील सांख्यिकीय बाबींसाठी “नोडल एजन्सी ” म्हणून घोषित करण्यात आले असल्याचे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले. सांख्यिकीय बाबींसंबंधी राज्य आणि केंद्रसरकारमधील दुवा म्हणूनही हे संचालनालय चांगले काम करते आहे. असे असले तरी संचालनालयाला आणखी चांगले काम करुन उत्कृष्टेचा ध्यास घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले.

 

प्रमुख पाहुणे प्रा. कांबळे यांनी स्वातंत्र्यापासून सुरु झालेली नियोजन आयोगाची वाटचाल ते आजच्या निती आयोगापर्यंतच्या वाटचालीचा विस्तृत आढावा मांडला. मध्यवर्ती संकल्पना “Use of Data in Decision Making” या विषयावर बोलताना त्यांनी संशोधक वृत्तीतून वैज्ञानिक पध्दतीने पायाभूत माहिती संकलन करण्याचे फायदे आणि नियोजनामध्ये त्याचा उपयोग कसा करता येईल ते पाहणे महत्वाचे असल्याचे स्पष्ट केले. गुणवत्तापूर्ण माहितीचा निश्चितच निर्णय प्रक्रियेवर चांगला प्रभाव पडतो त्यामुळे सांख्यिकी माहिती संकलन करताना पूर्वग्रहांना स्थान असता कामा नये असेही त्यांनी नमूद केले.

 

अध्यक्षीय समारोप प्रसंगी श्री. सुर्यवंशी यांनी प्रा.पी.सी. महालनोबीस यांच्या सांख्यिकी संबंधी गौरवपूर्ण कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच भारतामधील संस्थात्मक सांख्यिकीमध्ये प्रा.पी.सी. महालनोबीस यांनी केलेली भरीव कामगीरी व त्यामुळे देशाच्या विकासामधील त्यांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे विषद केले. त्यानंतर अर्थ व सांख्यिकी संचालनालय वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण माहिती संकलित करण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे नमूद करुन संचालनालयाने हमी चांगले काम करण्याकरिता कटीबध्द असल्याचे सांगितले. उपसंचालक श्री. कांबळे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सांख्यिकी कार्यालय, जिल्हा नियोजन समिती व जिल्हा मानव विकास समिती, जालना येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले.

 

-*-*

संबंधित पोस्ट

परवानाधारक/ वाहनचालक यांनी भाडेमीटर रिकॅलिब्रेशन करून घ्यावे

आम्ही झालो “लोकराज्य-सामाजिक संस्था..!”नवी मुंबईतील यशवंतराव चव्हाण फाउंडेशन सामाजिक संस्था झाली राज्यातील पहिली “लोकराज्य – सामाजिक संस्था”

शहीद जवानांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन*

vishwatmaklokswamivarta

फास्टट्रॅग चा नवीन पास:आता देशभर फिरण्यासाठी नवा टोल पास फायदा?

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणप्रत्येक जिल्ह्यात होणार एक ‘मधाचे गाव’-रविंद्र साठे

शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला सवलतीच्या प्रस्तावांना वाढीव मुदत· 31 जानेवारी अंतीम मुदत