vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान योजना जाहीर

गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान योजना जाहीर

 

        रायगड प्रतिनिधी:- महाराष्ट्र शासन कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास विभाग, शासन निर्णयनुसार, राज्यातील सहकारी दुध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधासाठी प्रतिलिटर रक्कम रु. ५/- अनुदान, गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले आहे. तसेच दूध भुकटी भारताबाहेर निर्यात करणाऱ्या प्रकल्पांना रु. ३०/- प्रतिकिलो प्रोत्साहनपर अनुदान अनुज्ञेय करण्यांत येत आहे. सदर योजना दि.१ जुलं २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीपर्यंत लागू राहील. तरी रायगड जिल्हयातील सहकारी संस्थमार्फत/ खाजगी संस्थेमार्फत, सहकारी दूध संघास खाजगी दूध प्रकल्पास दूध पुरवठा करत असल्यास, सदरच्या सहकारी दूध संघास / खाजगी दूध प्रकल्पास या योजनेमध्य सहभागी होण्यासाठी त्यांचा अर्ज मा. आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास, महाराष्ट्र राज्य यांना ddemaharashtra@gmail.com या ई मेल आयडीवर सादर करावा. अर्जासोबत खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करावीत.

 

सहकार / मल्टीस्टेट दूध संघासाठी संघाचे लेटरपॅडवर अर्ज, या अर्जासोबत सहकारी दूध संघाचे नांदणी प्रमाणपत्र, FSSI चे प्रमाणपत्र, अनुदान योजनेस सहभागी होण्यासाठी संघाचा ठराव.

 

खाजगी दूध प्रकल्पांसाठी खाजगी दूध प्रकल्पाचे लेटरपॅडवर अर्ज, ओद्यागिक विभागाचे कारखाना नांदणी प्रमाणपत्र, FSSI चे प्रमाणपत्र, अनुदान योजनेस सहभागी होण्यासाठी खाजगी दूध प्रकल्पाचा ठराव.

 

प्रस्तुत अनुदान योजना ही राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी लागू राहील. योजनेत सहभागी होणाऱ्या शेतक-यांकडील जनांवरांची नोंदणी (Eae Tag) भारत पशुधन पोर्टलवर असणे बंधनकारक आहे. शेतकऱ्याचा आधार कार्ड त्याचे बँक खात्याशी लिंक असावा, व तो भारत पशुधन पोर्टलवर नांद असावा. अधिकच्या माहितीसाठी जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, रायगड मो. क्र. ८३७८९८८७७७ यांचेशी संपर्क साधावा.

 

0000

संबंधित पोस्ट

विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या बैठकीचे 27 सप्टेंबर रोजी आयोजन…

vishwatmaklokswamivarta

झुडपी जंगलावरील जमिनीबाबत समन्वयाने कामाला गती द्या – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते व राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांना सीबीआयनं क्लीनचीट,काँग्रेसह विरोधी पक्षांनी सरकावर टीकेची झोड..

आंतरराष्ट्रीय टायगर दिन निमित्त पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं काही दूरदृष्टीपूर्ण उपक्रमांची घोषणा केली.वाघ हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे; त्याच्या ताकदीच्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. – पंतप्रधान नरेंद्र मोदी.

vishwatmaklokswamivarta

पणजी येथे 20 मार्चला डाक अदालत..

पालघरमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या 9 बोटी अद्याप परतल्या नाहीत …