vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कृषी विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्याव्यक्ती/संस्था/गट यांनी कृषी पुरस्कार-२०२३ साठी प्रस्ताव सादर करावेत  

कृषी विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्याव्यक्ती/संस्था/गट यांनी कृषी पुरस्कार-२०२३ साठी प्रस्ताव सादर करावेत

 

 

 

ठाणे, प्रतिनिधी- महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत राज्यात कृषी आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कृषी उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच कृषी विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती/संस्था/गट यांना डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, जिजामाता कृषीभूषण पुरस्कार, सेंद्रीय शेती कृषीभूषण पुरस्कार, उद्यान पंडीत पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार व कृषी विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येते. यानुषंगाने महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत सन २०२३ या वर्षामध्ये कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती / गट / संस्था यांच्याकडून विविध कृषी पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

 

तरी जास्तीत जास्त शेतकरी / गट / संस्था / व्यक्ती यांनी विविध कृषी पुरस्कार प्रस्ताव आपल्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत तसेच प्रस्ताव तयार करण्यासाठी अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, ठाणे श्री. दिपक कुटे यांनी केले आहे.

 

0000000000

संबंधित पोस्ट

प्रत्येक मंदिरामध्ये गोशाळा चालू झाल्यास गोरक्षण होईल !* – शेखर मुंदडा, अध्यक्ष, महाराष्ट्र गो सेवा आयोग

महाराष्ट्र राज्यासह कोकण किनारपट्टी आणि उत्तर भारतात गुलाबी थंडीचा जोर वाढला..

vishwatmaklokswamivarta

गुणरत्न सदावर्ते हाजीर हो!!! शिक्षा की सुटका.. लवकरच निर्णय….

पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि कुटुंबाकडून अखेरचा सॅल्युट

vishwatmaklokswamivarta

विभागीय युवा महोत्सवाकरीता रायगड जिल्हयाचा संघ जाहीर

vishwatmaklokswamivarta

परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्रातील ९९८ ठिकाणी सुरू असलेल्या ब्राह्मण समाजाच्या उपोषणाकडे राज्य सरकारने  दुर्लक्ष- दीपक रणनवरे

vishwatmaklokswamivarta