vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आगामी निवडणुका व पक्ष बळकटीकरणासाठी एआयएमआयएम पक्षाची आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यस्तरीय बैठक संपन्न.

आगामी निवडणुका व पक्ष बळकटीकरणासाठी एआयएमआयएम पक्षाची आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यस्तरीय बैठक संपन्न.

 

जालना जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी सादर केला कार्य अहवाल.‘आपका काम बहोत बढिया है मेहेनत करते रहीये’’राष्ट्रीय अध्यक्ष बॅ.असदुद्दीन ओवेसी साहेब यांच्याकडून शेख माजेद यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा.

 

राज्य प्रतिनिधी प्रतिनिधी :- जालना महाराष्ट्र राज्यात एमआयएम पक्षाचा विस्तार, बळकटीकरणासह आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची राज्यस्तरीय बैठक पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.खासदार इम्तियाज जलील हे देखील उपस्थित होते, एमआयएम जालना जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी कार्य अहवाल पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे सादर केला. या बैठकीत राज्यातील विविध जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्यांची उपस्थिती होती. यावेळी पक्ष संघटन वाढविण्यासाठी पक्ष अध्यक्ष तसेच महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील यांनी महत्त्वाच्या सुचना यावेळी पदाधिकार्यांना दिल्या. विविध जिल्ह्यातून आलेल्या जिल्हाध्यक्ष व पदाधिकार्यांसह पक्षातील वरिष्ठांनी विस्तारित चर्चा केली. जालना जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी गेल्या सात वर्षांमधील कार्य अहवाल हा पक्षाध्यक्षांकडे सादर केला. त्यांच्या कार्याची राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी प्रशंसा केली, व जोमात कामाला लागण्याचे आदेश सुद्धा दिले, यावेळी जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघाबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. जालना विधानसभेबद्दल या बैठकीत विस्तारीत चर्चा करण्यात आली. यावेळी मलकपेटचे आमदार अहमद बिन अब्दुल्लाह, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी, जालना शहराध्यक्ष जोहब अन्सारी, जिल्हा उपाध्यक्ष हाफिज शेख जावेद, फारुक भाई, समी बागवान, फॅसियोद्दीन अन्सारी, सय्यद आसेफ आदींची उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

अती दुर्गम भागातील ‘कनेक्टिव्हिटी’ वाढविण्यासाठी केंद्राला राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नगरपालिका प्रभाग रचना कालमर्यादेत पूर्ण करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

पुरग्रस्त शेतकऱ्यांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडन महाराष्ट्राला विशेष पॅकेज मिळवून देणार -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**धाराशिव बीड जालना येथील पूरग्रस्त गावांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली पाहणी* 

vishwatmaklokswamivarta

ऐरोली परिसरात मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भातअभ्यास अहवाल तयार करावा- वनमंत्री गणेश नाईक

मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ आणि स्मार्ट होणार असून बेस्ट बसेसची रिअल-टाईम माहिती गुगल मॅपवर पाहता येणार

४९ वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा-प्रदर्शन २०२४-दिवाळी अंक संपादक-प्रकाशकांना आवाहन ……

vishwatmaklokswamivarta