vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेपासून एकही पात्र महिला वंचित राहू नये- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेपासून एकही पात्र महिला वंचित राहू नये- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

 

 

        सांगली, प्रतिनिधी.) : राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्याचबरोबर त्यांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे तसेच त्यांच्या सशक्तीकरणास चालना मिळावी या उद्देशान महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना कार्यान्वीत केली आहे. या योजनेपासून सांगली जिल्ह्यातील एकही पात्र महिला वंचित राहता कामा नये, असे निर्देश कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात या योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, महानगरपालिका उपायुक्त शिल्पा दरेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संदीप यादव उपस्थित होते.

 

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे पुढे म्हणाले, या योजनेची अंमलबजावणी करत असताना कोणी पैशाची मागणी केल्यास त्याच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. विंशेषत: ग्रामीण भागात या योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी रिक्षाव्दारे प्रसिध्दी करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत या योजनेच्या परिपूर्ततेसाठी तसेच या योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने सांगली जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर यावा यासाठी प्रशासनाने सर्वोतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

प्रारंभी या योजनेसंदर्भात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संदीप यादव यांनी सादरीकरण केले. तर योजनेपासून कोणतीही पात्र महिला वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वोतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी दिली. या बैठकीसाठी तहसिलदार लिना खरात यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

 

00000

संबंधित पोस्ट

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील; मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले निर्देश…

vishwatmaklokswamivarta

भूमि अभिलेख विभागातील पदभरतीसाठी १३ व १४ रोजी परीक्षा

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र-झारखंड विजयी भाजप चाखणार विजयाची चव दिल्ली मुख्यालयात जलेबी बनवण्याची तयारी सुरू व्हिडिओ होत आहे व्हायरल…

vishwatmaklokswamivarta

Wardha: वर्धा शहरातील जिल्हा न्यायालयासमोर धावत्या मारुती व्हॅनला आग, कोणतीही जीवित हानी नाही

नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल – राज्यपाल रमेश बैस

पुण्यातील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये धक्कादायक प्रकार,सिम्बॉयसिसच्या प्राध्यापकाकडून हिंदू देवतांचा अपमान ; ‘त्या’ वक्तव्यानंतर पोलिसांकडून अटक