vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भूमि अभिलेख विभागातील पदभरतीसाठी १३ व १४ रोजी परीक्षा

भूमि अभिलेख विभागातील पदभरतीसाठी १३ व १४ रोजी परीक्षा

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमूह ४ (भूकरमापक) संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता १३ आणि १४ नोव्हेंबर २०२५ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक आणि उमेदवारांच्या प्रवेशपत्राची लिंक विभागाच्या https:\\mahabhumi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे यांनी कळविले आहे.

भूमि अभिलेख विभागातील उपरोक्त रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता १ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार विहीत कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.

परीक्षेचे वेळापत्रक याप्रमाणे-गुरुवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी पहिल्या सत्रात पहिल्या सत्रात पुणे आणि अमरावती विभागात परीक्षा होणार असून या विभागात परीक्षा केंद्र असणाऱ्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर सकाळी ८ वाजता उपस्थित राहावयाचे आहे. तर दुसऱ्या सत्रात नाशिक आणि नागपूर विभागांमध्ये केंद्र असणाऱ्या उमेदवारांनी दुपारी १२ वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावयाचे आहे.

शुक्रवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी पहिल्या सत्रात मुंबई (कोकण) विभागात परीक्षा केंद्र असणाऱ्या उमेदवारांनी सकाळी ८ वाजता तर दुसऱ्या सत्रात छत्रपती संभाजीनगर विभागात केंद्र असणाऱ्या उमेदवारांनी दुपारी बारा वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावयाचे आहे.

परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे प्रवेशपत्र व माहिती पुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://mahabhumi.giv.in वर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे भूमि अभिलेख कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन कक्ष स्थापन• नागरिकांना मार्गदर्शनासाठी 02482-223132 क्रमांक उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

पुढील सात दिवस महाराष्ट्रात  मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याचा अंदाज

विशेष लेख – जळगाव जिल्ह्याला मिळेल विकासाची सोनेरी झळाळी…!

vishwatmaklokswamivarta

कुटुंबाचा सामाजिक उपभोग : आरोग्य या विषयावर देशव्यापी पाहणी,सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी  प्रत्यक्ष भेट देऊन नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी

vishwatmaklokswamivarta

पारपत्र अर्जामध्ये दिलेल्या पत्त्याची चोख पडताळणी करणार-गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम