vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन कक्ष स्थापन• नागरिकांना मार्गदर्शनासाठी 02482-223132 क्रमांक उपलब्ध

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन कक्ष स्थापन• नागरिकांना मार्गदर्शनासाठी 02482-223132 क्रमांक उपलब्ध

 

जालना, प्रतिनिधी मराठा समाजातील नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र तसेच ऑनलाइन कुणबी नोंदी शोधण्याबाबत मदत व मार्गदर्शन मिळावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे विशेष हेल्पलाईन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 7 सप्टेंबर 2023 च्या शासन निर्णयासह सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 2 सप्टेंबर 2025 च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने ही कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्या पत्रानुसार जिल्हा स्तरावर आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शासनाने मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी या जात प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेसाठी मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यपद्धती निश्चित केली आहे. या प्रक्रियेला अधिक गती देण्यासाठी आणि नागरिकांना सुलभ सेवा मिळावी यासाठी गावपातळीवर ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

आदेशानुसार, मराठा समाजातील भूपुत्र, भूमिहीन, शेतमजूर अथवा वडिलोपार्जित शेती करणाऱ्या व्यक्तींकडे जमीन मालकीचे पुरावे उपलब्ध नसल्यास त्यांनी 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी किंवा त्यानंतर संबंधित परिसरात वास्तव्यास असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे. या प्रतिज्ञापत्राच्या आधारे सक्षम प्राधिकाऱ्यांकडून स्थानिक चौकशी करण्यात येणार असून, संबंधित व्यक्तीच्या गावातील किंवा कुळातील नातेवाईकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्याचीही पडताळणी केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार गावपातळीवरील स्थानिक समिती आणि वंशावळ समितीच्या सहाय्याने चौकशी करून निर्णय घेतला जाईल.

नागरिकांना या प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षामार्फत नागरिकांना कुणबी नोंदी शोधणे, जात प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करणे, ऑनलाइन नोंदींचा वापर करणे तसेच जात पडताळणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.हेल्पलाईन कक्षासाठी खालील अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत :• श्री. किशोर तायडे – नायब तहसीलदार (महसूल), जिल्हाधिकारी कार्यालय, जालश्री. अशोक झळके – महसूल सहाय्यक, जिल्हाधिकारी कार्यालय, जालनानागरिकांनी कुणबी जात प्रमाणपत्र व जात पडताळणीसंदर्भातील माहिती, मार्गदर्शन किंवा शंकानिरसनासाठी हेल्पलाईन क्रमांक 02482-223132 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

नवी मुंबईच्या विकासाला नवी गती मिळेल ” — महापौर-उपमहापौर निवडीनंतर वनमंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया

vishwatmaklokswamivarta

समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी वाहतूक तात्पुरती बंद

वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामांना गती द्या; गुणवत्तेबाबत तडजोड नको – मंत्री हसन मुश्रीफ

गॅस वितरणातील त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाफार्मर आयडीसह तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान विशेष शिबिरे पात्र शेतकऱ्यांनी शिबिरांचा लाभ घ्यावा ; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

ग्राहकांनी सतर्क राहून भेसळयुक्त अन्नपदार्थ आढळल्यास टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी- सहायक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे

vishwatmaklokswamivarta