
९ ऑगस्टच्या क्रांतीदिनी राज्यभर संविधान जागर यात्रेचा जागर होणार
(सुरेश गायकवाड)मुंबई- संविधान धोक्यात आहे,असे सांगून काही शक्ती कडून अपप्रचार केला जात आहे. हा अपप्रचार व अफवा दूर करण्यासाठी संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त येत्या ९ आगस्ट पासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या महाड मधून चवदार तळ्याचा सत्याग्रह केला तेथून ही संविधान जागर यात्रा सुरू करण्यात येणार आहे. ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रातून जाणार आहे . या यात्रेद्वारे फुले – शाहू – आंबेडकर व भारताचे संविधान व त्यातील मौल्यवान विचार,
मूलभूत तत्वे संविधानात असलेल्या भक्कम तरतूदी याबद्दल समाजात व्यापक जागृती करण्यात येणार आहे. अशी माहिती संविधान जागर यात्रेचे संयोजक व भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड .वाल्मिक निकाळजे व जयभीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष नितीनभाऊ मोरे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सामाजिक संघटनेचे प्रमुख राजेंद्र गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन भारत सरकार नवी दिल्ली व आधार महिला कौशल विकास केंद्र मुंबईच्या अध्यक्षा योजनाताई ठोकळे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष शरद कांबळे, अनुसूचित जाती मोर्चाचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष स्नेहाताई भालेराव,आकाश अंभोरे, नागसेन पुंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातील फुले, शाहु, आंबेडकरी चळवळीतील सुमारे २५० पक्ष, संघटना, संस्था, मंडळे यांनी एकत्रीत येऊन बैठकांद्वारे चिंतन करून संविधान जागर समिती, महाराष्ट्र” स्थापन केली आहे.
सत्याग्रह भूमी महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे येथुन “सविधान जागर यात्रेची सुरुवात होणार असून यात्रेचा समारंभ केंद्रीयमंत्री नितीनजी गडकरी,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह
राज्यातील मान्यवर नेते आणि कोअर समितीचे प्रमुख सदस्य यांच्या उपस्थितीत ९ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनी सकाळी १० वा होणार आहे.
ही यात्रा कोकण भूमीतून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खान्देश, (उत्तर महाराष्ट्र) मार्गे संविधान जागर यात्रा ठाणे जिल्हयातून चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे ८ संप्टेबर २०२४ रोजी सकाळी पोहचणार आहे.
तेथेच या यात्रेचा समारोप होणार असल्याची माहिती संयोजक नितीन मोरे यांनी दिली.



