vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेस्थानिक बातम्या

अपहरण झालेल्या शिवम वर्माचा शोध घेण्यासाठी वडाळा लोहमार्ग पोलीसांचा युद्धपातळीवर शोध सुरु…

 अपहरण झालेल्या शिवम वर्माचा शोध घेण्यासाठी वडाळा लोहमार्ग पोलीसांचा युद्धपातळीवर शोध सुरु…

 

सुरेश गायकवाड प्रतिनिधी यास कडून

[मुंबई- वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपहरण झालेल्या शिवम रामलोटन वर्मा वय १७ वर्ष यांचा शोध घेण्यासाठी पोलीस सक्रिय झाले असून त्याचा युद्धपातळीवर तपास सुरू आहे.

 

याबाबत असे कि, दि. २९ मार्च २०२४ रोजी रात्रों १०.२० वाजताच्या दरम्यान चेंबूर रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक 2 अप सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलचे मोटरमन बाजूकडील दूसरे क्रमांकांचे जनरल डब्यात नातेवाईक यांचेसह चढला असता त्यांचा पुतण्या नामे- शिवम राम लोटन वर्मा १७ वर्ष अधिक उंची – अंदाजे ५ फूट २ इंच अंगाने मजबूत रंगाने सावळा, चेहरा गोल नाक सरळ बस्के, केस काळे मध्यम, अंगात – फिकट गुलाबी रंगाचा फूल बाह्याचा टी शर्ट, नेसणीस – निळ्या रंगाची फूल ट्रॅक पॅन्ट, ओळख चिन्ह – डाव्या हातात लोखंडी कडा घातलेला, डाव्या कानात पिवळ्या धातूची बाळी घातलेला सदर मुलगा गतीमंद असून गाडीत गर्दी असल्याने त्याच्या जवळ निळ्या रंगाची कापडी पिशवी त्यात वापरते कपडे व खाण्याचे पदार्थ असे असल्याने सदर गाडीत त्याला चढता आले नाही तो तेथेच चेंबूर रेल्वे स्थानकावर येथे फलाटावर राहिल्याचे लक्षात येताच फिर्यादी व त्याचे नातेवाईक हे त्यांचे नातेवाईक यांचेसह टिळकनगर रेल्वे स्टेशन येथे उतरून परत चेंबूर रेल्वे स्टेशन येथे येऊन त्यांच्या पुतण्याचा शोध घेतला असता तर तो मिळून आला नाही. म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद केला आहे. तरी सदर गुन्हयातील वर्णनाचे मुलाबाबत काही माहिती मिळाल्यास त्यांनी वडाळा लोहमार्ग पोलीस ठाणे दुरध्वनी क्रमांक-022-67453113 आणि तपास अधिकारी पोलीस उपनिरिक्षक जे. डी गावित यांचा भ्रमणध्वनी क्रमांक . . . यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण..

बदनापूर तालुक्यातील वाल्हा येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

देशातील भटक्या जमातींना ओबीसीबाहेर आरक्षण देण्याचा विचार सुरू, रामदास आठवलेंची माहिती

vishwatmaklokswamivarta

कापुरबावडी वाहतुक उपविभागाचे हद्दीत साई जलाराम प्रतिष्ठान तर्फे गोपाळकाला निमित्त दहिहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त या परिसरातील वाहतुकीत दि. 7 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10.00 ते रात्रौ 22.00 वाजेपर्यंत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी दिली आहे.

vishwatmaklokswamivarta

लोकसभा निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्यासाठीराजकीय पक्षांनी सहकार्य करावे- निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे

मुंबईतील वाडिया रुग्णालयाला आग, मदत आणि बचाव कार्यास सुरुवात, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी