
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा आज दि.7 ऑगस्ट 2024 रोजी ठाणे जिल्हा दौरा
ठाणे, (जिमाका) :- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन हे उद्या दि.7 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 06.00 वा. गडकरी रंगायतन, सभागृह ठाणे येथे “योध्दा कर्मयोगी – एकनाथ संभाजी शिंदे” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
दि. 7 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 06.00 वा. राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे (प.) येथे आगमन. सायंकाळी 06.24 वा. डॉ.प्रदीप ढवळ लिखित “योध्दा कर्मयोगी – एकनाथ संभाजी शिंदे” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा. सायंकाळी 07.00 वा. मोटारीने प्रयाण.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष तथा “योध्दा कर्मयोगी – एकनाथ संभाजी शिंदे” या पुस्तकाचे लेखक डॉ.प्रदीप ढवळ, पद्मश्री शंकर बाबा पापलकर, शारदा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन विलास ठुसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
00000000
वृ.क्र.662/2024



