vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिध्दीकरिता:मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये सहभाग वाढीसाठी नमुंमपा मुख्यालयातील कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद..

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिध्दीकरिता:मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये सहभाग वाढीसाठी नमुंमपा मुख्यालयातील कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद..

 

नवी मुंबई प्रतिनिधी

l महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ या सारख्या अत्यंत उपयोगी योजनेचा लाभ नवी मुंबईतील जास्तीत जास्त युवकांना व्हावा तसेच या कक्षेत नवी मुंबईतील विविध स्वरुपाच्या आस्थापना व उद्योग समुहांनी सहभागी व्हावे यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका विशेष प्रयत्नशील असून त्यादृष्टीने या योजनेचा विविध माध्यमांतून प्रचार व प्रसार करण्यात येत असल्याची माहिती देत नमुंमपा अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांनी याकरिता आयोजित केलेल्या कार्यशाळेस विविध आस्थापना व उ्दयोगांनी दिलेल्या उत्साही प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त केले.

l ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावी व यासाठीच्या महास्वयम् पोर्टलवर नवी मुंबईतील जास्तीत जास्त आस्थापना व उद्योगसमुह यांनी नोंदणी करावी याकरीता महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित योजनेच्या कार्यशाळेप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांनी उपस्थितांना या योजनेची माहिती दिली व योजनेचा लाभ घेणेबाबत आवाहन केले. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, भांडार विभागाचे उपआयुक्त श्री.राजेंद्र चौगुले, समाजविकास विभागाचे सहा.आयुक्त श्री. प्रबोधन मवाडे व इतर अधिकारी उपस्थित होते.

 

 

 

l या कार्यशाळेत योजनेचे जिल्हा समन्वयक श्री. विमलेश शिरकर यांनी सादरीकरणाव्दारे महास्वयम् ॲपवर युवकांनी तसेच आस्थापना व उद्योगांनी आपली नोंदणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध रुग्णालये, हॉटेल्स, मॉल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स, मार्ट अशा विविध आस्थापना तसेच उद्योग, लघु उद्योग यांचे 150 हून अधिक प्रतिनिधी आणि काही युवक उपस्थित होते.

 

l यावेळी उपस्थितांनी पोर्टलवर नोंदणीविषयी तसेच योजनेच्या कार्यप्रणालीविषयी विविध प्रश्न विचारीत अधिकची माहिती करुन घेतली. जिल्हा समन्वयक श्री. विमलेश शिरकर यांनी सर्वांचे शंका समाधान केले. ही योजना युवक तसेच आस्थापना व उ्दयोग समुह या दोन्ही घटकांना अत्यंत उपयोगी असून या योजनेची माहिती आपल्यामार्फत जास्तीत जास्त प्रसारीत करावी असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

 

l महाराष्ट्र राज्यातील रोजगाराभिमुख युवकांतील कौशल्य विकास करणे व या माध्यमातून त्यांना रोजगार सक्षम बनविणे हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ जाहीर केली असून या माध्यमातून युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यात येत आहे.

l महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ही अभिनव योजना राबविण्यात येत असून या माध्यमातून विनाअनुभवी रोजगार इच्छुक अशा पात्र उमेदवारांना विविध आस्थापना व उद्योग यामध्ये सहा महिने कालावधीकरिता प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण (Internship) देण्यात येणार आहे.

 

 

l विशेष म्हणजे या प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार 12 वी पास युवकांना रू. 6 हजार, आयटीआय अथवा पदविका रू. 8 हजार, पदवी अथवा पदव्युत्तर पदवी रू. 10 हजार दरमहा विद्यावेतन शासनामार्फत दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संबधित आस्थापना अथवा उ्दयोग यांच्याकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे प्रमाणपत्रही प्राप्त होणार आहे. या अनुभव प्रमाणपत्राचा उपयोग पुढे नोकरी व व्यवसायात होणार आहे.

l या योजने अंतर्गत शासनाच्या महास्वयम् पोर्टलवर नोंदणी करावी व कुशल मनुष्यबळ निर्मितीत योगदान द्यावे असे आवाहन उपस्थित आस्थापना व उद्योगसमुह प्रतिनिधींना करतानाच अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी महापालिका क्षेत्रात एकही बेरोजगार युवक नसेल यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. या माध्यमातून युवकांना कौशल्यपूर्ण बनवून देशाची युवाशक्ती विधायक मार्गाकडे सकारात्मक भूमिकेतून वळविण्यासाठी काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले

संबंधित पोस्ट

विधान परिषद प्रश्नोत्तरे-नदी किनारी पूर रेषेसंदर्भात असलेल्या ब्ल्यू लाईनबाबत पुन्हा सर्वेक्षण- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

भटकंती करणाऱ्या वृद्धाला सामाजिक कार्यकर्त्यांनी वृद्धाश्रमात केले दाखल*

vishwatmaklokswamivarta

जमिन मुल्यांकन विषय चिघळण्याच्या मार्गावर आजुनही वेळ गेलेली नाही, प्रशासनाल 4 तारखेची डेडलाईन-दिलीप राठी* 5 तारखेला शेकडो शेतकरी आत्मदहन करणार* जिल्हाधिकारी, एसडीएम यांच्या एसीबी चौकशीवर ठाम

vishwatmaklokswamivarta

बालकांशी निगडीत सामाजिक समस्या निराकरणासाठीकालबद्ध कार्यक्रम राबवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार जाहीर..

काँग्रेस नेते भारत तोडण्याचे आवाहन करणाऱ्या व्यक्तीसोबत प्रवास करत आहेत, स्मृती इराणींनी भारत जोडो यात्रेवरून राहुल गांधींवर डागली तोफ

vishwatmaklokswamivarta