vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिष्यवृत्ती, गुणवत्ता पुरस्कार व निवार्ह भत्ता योजनेचे अर्ज25 ऑगस्ट पर्यंत सादर करण्याचे आवाहन

शिष्यवृत्ती, गुणवत्ता पुरस्कार व निवार्ह भत्ता योजनेचे अर्ज25 ऑगस्ट पर्यंत सादर करण्याचे आवाहन

 

        सांगली, प्रतिनिधी(जि. मा. का.) : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील मॅट्रकीत्तर शिष्यवृत्ती फ्रिशीप, छत्रपती राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार व निवार्ह भत्ता या योजनेसाठी अनुसूचित प्रवर्गातील अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर प्रलबिंत आहेत. हे अर्ज सहायक आयुक्त समाज कल्याण सांगली कार्यालयस्तरावर पाठविण्यासाठी दि. 25 ऑगस्ट 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. या अंतिम दिनांकानंतर विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावरील प्रलबिंत अर्ज योजनेस त्रुटी पुर्तता होत नसल्याने व पात्र नसल्याचे समजून सर्व अर्ज रद्दबादल होतील याची नोंद सर्व विद्यार्थी, पालक व महाविद्यालयाच्या प्रचार्यांनी घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.

 

संबंधित महाविद्यालयास सहायक आयुक्त समाज कल्याण सांगली कार्यालयाव्दारे पत्रव्यवहार, मेल, व्हॉटसॲप ग्रुप च्या माध्यमातून वारंवार कळवून देखील अनुसूचित जाती प्रवर्गातील दि. 6 ऑगस्ट 2024 च्या महाडिबीटी पोर्टलवरील डॅशबोर्डनुसार एकूण नोंदणीकृत झालेल्या 9 हजार 1 अर्जापैकी विद्यार्थी स्तरावर 295 अर्ज, महाविद्यालय स्तरावर 504 अर्ज अद्याप प्रलबिंत असल्याची बाब गंभीर असून विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावरील पात्र परिपूर्ण अर्ज विहीत मुदतीत सादर करावेत, असे आवाहन श्री. चाचरकर यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

संविधान व कायद्याच्या आधारे मार्गक्रमण केल्यास यशप्राप्ती- सचिव सतीश वाघोले

vishwatmaklokswamivarta

सरकारची मराठा-ओबीसी ऐक्याला धक्का देणारी भूमिका — डॉ. संजय लाखे पाटील; उपसमितीला पडताळणीचा अधिकार नाही

नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 उमेदवारांना आता ऑफलाईन पध्दतीनेही नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार- रविवार दि.16 नोव्हेंबर या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथील वारणा विद्यापीठास समुह विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

राज्य एसटी बस प्रमाणे स्मार्ट सिटी बस मध्येही सर्व पत्रकारांना मोफत प्रवास पास द्यावी

vishwatmaklokswamivarta