vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेशव्यवसाय

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठक : निर्णय पशुसंवर्धन व दुग्धविकास विभाग विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार१४९ कोटीस मान्यता

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठक : निर्णय पशुसंवर्धन व दुग्धविकास विभाग विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार१४९ कोटीस मान्यता

 

 

राज्य प्रतिनिधी

विदर्भ आणि मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकासाला गती देण्यासाठी दुग्धविकास प्रकल्पाचा टप्प्पा-२ राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

 

यासाठी १४९ कोटी खर्चास मान्यता देण्यात आली. प्रकल्पाची एकूण किंमत ३२८ कोटी ४२ लाख इतकी असून यापैकी १७९ कोटी १६ लाख हिस्सा हा शेतकरी आणि पशुपालकांचा आहे. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्स करण्यामध्ये शेती व शेतीपूरक व्यवसायांचा समावेश असून यामध्ये दुग्ध व्यवसायाचा देखील वाटा आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

 

विदर्भ आणि मराठवाड्यातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, गडचिरोली, अमरावती, अकोला, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, नांदेड, लातूर, धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प २०२६-२७ पर्यंत राबविण्यात येईल. यापूर्वी २०१६ मध्ये हा प्रकल्प विदर्भ मराठवाड्यातील ११ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आला होता. या प्रकल्पात गोठीत रेतमात्रांचा वापर करून कृत्रिम रेतनाची व्यवस्था तसेच भ्रृण प्रत्यारोपण करून दुधाळ जनावरांची संख्या वाढविणे, शेतकऱ्यांना वैरण विकास कार्यक्रम, संतुलित आहार आणि दर्जेदार चारा पुरवठा करणे, पशु आरोग्य सुविधा पुरविणे, उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गाई म्हशींचे वाटप करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून रोजगार निर्मिती देखील करणे अशी उद्दिष्टे आहेत.

 

या ३ वर्षांच्या कालावधीत या १९ जिल्ह्यात १३ हजार ४०० दुधाळ गाई आणि म्हशींचे वाटप करण्यात येईल. या प्रकल्पाचे मुख्यालय नागपूर येथे राहील. तसेच जिल्हा प्रकल्प अधिकारी याची अंमलबजावणी करतील

संबंधित पोस्ट

भाजपला रोखण्याच्या नादात काँग्रेसने स्वता:ला बर्बाद करु नये, राज्यातून सोनिया गांधींना आणखी एक पत्र….

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ७५ ठिकाणी;तर मुंबई जिल्ह्यात माहिम, विलेपार्ले आणि खारघर (नवी मुंबई) येथे ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’श्रीगुरुतत्त्वाचा एक हजारपटीने लाभ करून घेण्यासाठी गुरुपौर्णिमेत सहभागी व्हा ! – सनातन संस्थेचे आवाहन

शेतीसंबंधित शंका निरसन व मार्गदर्शनासाठी कृषी विभागाचे टोल फ्री क्रमांक व व्हॉटसअप क्रमांक कार्यान्वित..

अध्यापक महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकांची तासिका तत्वावर नियुक्ती

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अमेरिका आणि युरोपमधील सुरू असलेल्या बँकिंग संकटावर महत्त्वपूर्ण इशारा दिला

महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने: अमरावतीतील उद्योजकांना ‘मैत्री’ पोर्टलचा लाभ घेण्याचे आवाहन