vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने: अमरावतीतील उद्योजकांना ‘मैत्री’ पोर्टलचा लाभ घेण्याचे आवाहन

महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने: अमरावतीतील उद्योजकांना ‘मैत्री’ पोर्टलचा लाभ घेण्याचे आवाहन

        अमरावती, प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन 2027 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचविण्याचे महाराष्ट्र शासनाचे ध्येय आहे. या ध्येयपूर्तीसाठी आणि राज्यात उद्योग स्थापन करण्यासाठी उद्योग, व्यापार व सेवा क्षेत्रातील गुंतवणूकदारांना सर्व आवश्यक परवाने, मंजुरी, ना-हरकती, सवलती व तक्रार निवारण या सेवांचा वेगवान, पारदर्शक आणि सुलभपणे लाभ एकाच ठिकाणी देण्यासाठी एक खिडकी प्रणाली म्हणून उद्योग विभागांतर्गत ‘मैत्री’ कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्ह्यामध्ये सध्या सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमाअंतर्गत एकूण 1 लाख 6 हजार 390 उद्योग (1, लाख 5 हजार 540 सूक्ष्म, 807 लघु व 43 मध्यम) नोंदणीकृत आहेत. या उद्योजकांना लाभ व्हावा यासाठी मैत्री 2.0 पोर्टलवर 14 विभागांच्या 124 सेवा एकत्रित करून उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यात एक खिडकी अर्ज प्रणाली (https://maitri.maharashtra.gov.in), तक्रार समस्या निवारण , हेल्पलाईन मदत कक्ष (Call Centre) – क्रमांक 1800 233 2033, गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक आणि प्रोत्साहन गणना यांसारख्या सेवांचा समावेश आहे. वरील प्रमाणे सेवांचा लाभ आपल्या जिल्ह्यातील सर्व उद्यमी यांना व्हावा, ज्यामुळे जिल्ह्यातील उद्योगाची वाढ होण्यास मोठी मदत होईल आणि एकूणच जिल्ह्यांच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजक व गुंतवणूकदारांनी वरील सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून प्रवेशासाठीपुणे येथे 7 डिसेंबरला पात्रता परीक्षा..

अमरावती मेस्को क्षेत्रीय कार्यालय येथेमाजी सैनिकांसाठी लिपिक पदांची भरती

vishwatmaklokswamivarta

नववर्षानिमित्त मद्यविक्री कालावधीत शिथिलता…

vishwatmaklokswamivarta

राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे योजनाप्रवासी कंपनीची निवड करण्याकरिता GeM पोर्टलवर निविदा प्रसिद्ध

vishwatmaklokswamivarta

मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाच्यामहत्वाकांक्षी प्रकल्पांना आशियाई विकास बँकेकडून निधी,मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची आशियाई विकास बँक अधिकारी यांच्याशी चर्चा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta