vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

शुक्रवारी माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह व रोजगार मेळावा 

शुक्रवारी माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह व रोजगार मेळावा

नांदेड प्रतिनिधी:- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माहूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 27 मार्च 2026 रोजी हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्लेसमेंट ड्राईव्ह /रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी आस्थापनामध्ये रोजगार व नोकरीच्या संधी साठी मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी शुक्रवार 27 मार्च 2026 सकाळी 10 वा. पासून हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माहूर येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.

अधिक माहिती व संपर्कासाठी मा. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com दूरध्वनी क्रमांक 02462-251674 व सोनल मात्रे 8830807312 वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

इस्त्राईलमध्ये नूतनीकरण बांधकाम क्षेत्रात – जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी रोजगाराची सुवर्णसंधी…

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यात २९ व ३० एप्रिल रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा; तरुणांना ‘शिका आणि कमवा’ योजनेची संधी

उद्योजकांच्या समस्यांचे निराकरण कालमर्यादा ठरवून करावे-जिल्हाधिकारी अशोक काकडे

भारतीय टपाल विभागाची “फ्रँचायझी 2.0” योजना सुरू;रोजगारासह टपाल सेवा विस्ताराची मोठी संधी

वाळू निर्गती धोरण 2025 चे प्रारुप-हरकती व सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध..

vishwatmaklokswamivarta

एमसीईडीत नवउद्योजकांसाठी क्षमता बांधणी कार्यशाळा”विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर”