vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्ह्यातील आदिवासी जमातीच्या व्यक्तींनाविविध दाखले वाटपासाठी शिबिरांचे आयोजन

जिल्ह्यातील आदिवासी जमातीच्या व्यक्तींनाविविध दाखले वाटपासाठी शिबिरांचे आयोजन

 

 

रायगड(जिमाका:-जिल्ह्यातील आदिवासी जमातीच्या व्यक्तींना प्रत्येक गावांमध्ये व वाडयांमध्ये जाऊन जातीचे दाखले, आयुष्यमान भारत कार्ड, रेशनकार्ड, आधारकार्ड, जनधन खाते, इतर आवश्यक प्रमाणपत्रे व पीएम किसानचा लाभ देण्याकरिता दि.23 ऑगस्ट ते दि.31 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये शिबीरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.

 

आदिम जमातीच्या (कातकरी) विकासाकरिता प्रधानमंत्री आदिवासी न्याय महाअभियान (PM- JANMAN) ही मोहिम देशभरात राबविण्यात येत आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्राधान्यक्रमात आहे. या योजनेच्या अंमलबजावणीकरीता केंद्र शासनाने 11 प्राथम्य क्षेत्र निश्चित केले असून त्यामध्ये 9 मंत्रालयाचा समावेश केला आहे. या कार्यक्रमांतर्गत आदिम जमातीच्या लोकांना जातीचे दाखले, आयुष्यमान भारत कार्ड, रेशनकार्ड, आधारकार्ड, जनधन खाते, इतर प्रमाणपत्रे व पीएम किसान चा लाभ देण्यात येणार आहे.

 

प्रकल्प अधिकारी,आदिवासी विकास प्रकल्प पेण, जिल्हा आरोग्य अधिकारी, रा.जि.प., तहसिलदार सर्व, गट विकास अधिकारी-पंचायत समिती सर्व, तालुका कृषी अधिकारी सर्व व अग्रणी बँक व्यवस्थापक यांचा या शिबिरात समावेश असणार आहे.

 

जातीचे दाखला, आयुष्यमान भारत कार्ड, रेशनकार्ड, आधारकार्ड, जनधन बचत खाते, पीएम किसानचा लाभ यापासून एकही आदिम व्यक्ती वंचित रहाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

 

००००००

संबंधित पोस्ट

छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धेत जालना पोलीस फुटबॉल संघ विजयी…

vishwatmaklokswamivarta

स्मशानभूमी समस्या निवारण अभियान मे अखेर जिल्ह्यातील स्मशानभूमी समस्यामुक्त करण्याचा निर्धार..

टपाल खात्यातर्फे राखी पाकिटे*वितरणासाठी स्वतंत्र पत्रपेट्यांची सोय*

सकळ मराठा समाज आणि मराठा सामाजिक संघटनांच्या दट्ट्याने जायकवाडीत पाणी सोडणे भाग पडले ः डॉ. संजय लाखेपाटील

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी यांनी केली वेश्वी येथिल शासकीय रोपवाटिकेची पाहणी…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.  मान्सून महाराष्ट्रात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे, हवामान खात्याने पुढील काही दिवस राज्यभर यलो अलर्ट जारी..

vishwatmaklokswamivarta