
गणेशोत्सवाचा जिल्हाधिकारी यांनी संबधित यंत्रणेचा घेतला आढावा.पर्यावरण पूरव उत्सव साजरा करण्याच्या संबधिता सूचना
ठाणे, प्रतिनिधी:- पर्यावरण पूरक गणेशोत्सव, कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी समिती सभागृहामध्ये संबधित यंत्रणेचा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आढावा घेतला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉ.डी.एस.स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, सहायक पोलीस आयुक्त मंदार जावळे, योगेश गावडे, वाहतूक सहायक पोलीस आयुक्त विजयसिंह भोसले, ठाणे महानगरपालिका उपायुक्त जी.जी.गोदेपूरे, नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त डॉ.कैलास गायकवाड, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सहायक आयुक्त सोनम देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे तसेच संबधित विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
सर्व महानगरपालिका यांनी कृत्रिम तलावांची संख्या वाढवा,आपल्या कार्यक्षेत्रातील रस्ते व्यवस्थित करा.गणेश मंडळाना वेळेवर आवश्यक परवागी द्या.ध्वनी प्रदुषण होणार नाही यांची काळजी घ्या.वाहतूक कोंडी होणार नाही यांची दक्षता घ्या.पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरण पूरव गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करा.अशा सुचना जिल्हाधिकारी शिनगारे यांनी संबधिताना दिल्या.
हा उत्सव परंपरे नुसार साजरा होणे गरजेचे आहे.या सणाचे पावित्र्य जपले पाहीजे.कोण चुकीचे वागत असेल तर त्याच्यावर कारवाई करा.गणपती विसर्जनासाठी पुरेसा बंदोबस्त ठेवा.तसेच तिथे लाईटची व्यवस्था करा.गणेश उत्सव हा पर्यावरण पुरक असला पाहीजे.केंद्र शासन व राज्य शासनाचे दिलेल्या सुचनाचे काटेकोर पालन करा.गणपती विसर्जन करताना मुर्तीची विटंबना होणार नाही यांची काळजी घ्या.गणेश उत्सव मंडळाना परवागी देताना नियमाचे काटेकोरपणे पालन करा.गणेश उत्सव मंडळाना कोणतीही अडचण होणार नाही यांची काळजी घ्या.उत्सावामध्ये सामाजिक सलोखा राखला जाईल यांची काळजी घ्या.असे ही यावेळी श्री.शिनगारे यांनी सांगितले.
0000000



