vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आपले सरकार पोर्टलद्वारे नागरिकांच्या तक्रारीचात्वरीत निपटारा करावा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

आपले सरकार पोर्टलद्वारे नागरिकांच्या तक्रारीचात्वरीत निपटारा करावा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

छत्रपती संभाजीनगर जिमाका)- शासनाचा विविध सेवा सुविधा ऑनलाईन पध्‍दतीने करुन जलदगतीने तक्रारी चे निराकरण करावे, सर्वसामान्‍य नागरिकांना या तंत्रज्ञानाचा वापर करुन कुठलाही त्रास होणार नाही. तंत्रज्ञानाचा शासकीय कामकाजामध्‍ये वापर करुन तक्रारीचा निपटारा त्‍वरीत करावा, असे निर्देश दिलीप स्‍वामी यांनी दिले.

 

आपले सरकार पोर्टल राज्‍यामध्‍ये प्रभावी पध्‍दतीने राबविणेकरीता जिल्‍हाधिकारी कार्यालयात मा. जिल्‍हाधिकारी यांच्‍या उपस्थितीत प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्‍यात आले.

 

प्रशिक्षणासजिल्‍हा परिषद चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विकास मीना, अपर जिल्‍हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्‍हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्‍हाधिकारी (सा.प्र.) प्रभोदय मुळे, मंत्रालयातील ई गव्‍हर्नन्‍स तज्ञ देवांग दवे, हर्षल मंत्री तसेच विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

 

आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारींचा 100 टक्‍के निपटारा व्‍हावा यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले. यावेळी निवडणूकीत 22 अॅप हाताळले असल्‍याचे जिल्‍हाधिकारी यांनी सांगितले. आपल्‍या जिल्‍ह्याची माहिती पोर्टलवर देणे चांगले काम आहे. आपले सरकार 2.0 असे पोर्टल तयार करण्‍यात आले आहे. या पोर्टलअॅपचा उपयोग अधिका-यांवरील कामाचा ताण कमी करण्‍यासाठी होईल.

 

ई गव्‍हर्नन्‍स तज्ञ देवांग दवे यांनी या अॅपचा उपयोग नागरीक आणि प्रशासन यांना ऑनलाईन संवाद सेतू निर्माण करणारे ‘आपले सरकार 2.0’ शासनाचा महत्‍वपूर्ण प्रकल्‍प आहे. जिल्‍ह्यातील नागरिकांसाठी ऑनलाईन पध्‍दतीने तक्रार दाखल करता यावी व प्रशासनाने ऑनलाईन पध्‍दतीने तक्रारीचे निवारण करावे यासाठी ‘आपले सरकार 2.0’ ही तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित करण्‍यात आलेले आहे. हे पोर्टल तक्रारीचे निराकरण करण्‍याची प्रक्रिया सुलभ, पारदर्शक वापरकर्ता, अनुकुल प्‍लॅटफॉर्म प्रदान करुन तक्रारी मांडण्‍यासाठी आणि वेळेवर निराकरण करण्‍यासाठी सक्षम करते. नागरीकांनी ऑनलाईन तक्रार केल्‍यास कमी वेळेत तक्रार निवारण करता येईल.या अॅपमध्‍ये तक्रार 500 ऐवजी 1 हजार शब्‍दात मांडण्‍याची सुविधा दिली आहे. यामुळे नागरिकांचे होणारे हेलपाटे टाळता येतील. तक्रारी 21 दिवसात निकाली काढण्‍याचे शासन निर्णयही निर्गमित केला. यामुळे शासनात आणि सामान्‍य जनतेत कामकाजाबाबत पारदर्शकता राहील, असे देवांग दवे यांनी सांगितले.

 

जिल्‍हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी या प्रशिक्षणास उपस्थित असलेले अधिकारी व कर्मचारी यांना ‘आपले सरकार 2.0’ या अॅप जास्‍तीत जास्‍त लोकांपर्यत पोहचणे व तक्रारी मार्गी लावणे याकडे अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, असे यावेळी सांगितले

 

निवासी उपजिल्‍हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी प्रास्‍ताविकात ‘आपले सरकार 2.0’ या अॅपविषयी माहिती दिली.

 

०००००

संबंधित पोस्ट

मुंबई ते गोवा मडगावदरम्यान 3 जूनला वंदे भारत एक्स्प्रेस धावणार…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने गाजलेले गडकिल्ले ठरणार जागतिक वारसासांस्कृतिक विभागाकडून केंद्र सरकारकडे पाठवलेला प्रस्ताव युनेस्कोकडे सादर‘मराठा लष्करी रणभूमी परिसर’मधील १२ गडकिल्ल्यांच्या समावेशाची शिफारस

vishwatmaklokswamivarta

जागतिक पत्रकार दिन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या कार्यालयात संपन्न.

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक *ऐन गणेशोत्सवात श्रीगणेशाचा जाहिरातीसाठी विडंबनात्मक वापर* !*बिनशर्त माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा; हवेल्स व न्यूट्रिका कंपन्यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नोटीस*

vishwatmaklokswamivarta

एसटी महामंडळातील दोषी अधिकाऱ्याला तातडीने बडतर्फ करणार— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक• स्पष्ट, कायदेशीर स्पीकिंग ऑर्डर देत बडतर्फ करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

काँग्रेस नेते राहुलगांधी यांच्या दिल्ली तीन निवासस्थानी- इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिवसेना-भाजपची टीका