vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 चे आयोजन

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 चे आयोजन

 

 

 

ठाणे, प्रतिनिधी : दि.07 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शासन स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार आहे.

 

शासनाने निश्चित केलेल्या निकषाच्या आधारे पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. शासनाने ठरविलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या किंवा करु शकणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीच स्पर्धेसाठी अर्ज करावयाचा असून अर्जाचा नमुना, गुणांकनाचे निकष, आवश्यक कागदपत्रे, फोटो व व्हिडीओबाबत तपशील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दि.31 जुलै 2024 च्या शासन निर्णयामध्ये दिला आहे. (हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.)

 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेसाठीचे परिपूर्ण अर्ज प्रकल्प संचालक, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर दि.31 ऑगस्ट 2024 पूर्वी ऑनलाईन सादर करावयाचे आहेत.

 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून प्राप्त झालेले जिल्हानिहाय अर्ज प्रकल्प संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयास दि.05 सप्टेंबर 2024 पूर्वी उपलब्ध करुन देतील.

 

जिल्हास्तरीव निवड समिती प्रत्येक गणेशोत्सव मंडळास अभिप्रायासह गुणांकन देईल. जिल्हास्तरीय समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या 4 जिल्ह्यातून प्रत्येकी 3 व अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी 1 उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस प्रकल्प संचालक, पु.ल. देशपांडे कला अकादमी यांच्यामार्फत ई-मेलद्वारे राज्यस्तरीय निवड समितीकडे करेल.

 

राज्यस्तरीय समिती प्राप्त शिफारशीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधून गुणांकन व संबंधित कागदपत्रांच्या आधारे पहिल्या 3 विजेत्यांची निवड करतील. राज्यस्तरीय पहिल्या 3 विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येईल.

संबंधित पोस्ट

होमगार्ड नोंदणीसाठी 14 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

आपत्तीत मदत व बचाव कार्यासाठी-एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क

परिवहन सेवांसाठी अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा Ø परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

तासगाव-कवठेमहांकाळ, जत विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त सर्वसाधारण निरीक्षक कुलदीप शर्मा जिल्ह्यात दाखल

vishwatmaklokswamivarta

विभागीय आयुक्तांची पत्रपरिषद मुंबई शिक्षक व पदवीधर,कोकण विभाग पदवीधर,विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर

राज्यस्तरीय शालेय शिक्षण परिषदेचा समारोप; शालेय शिक्षणमंत्री दोन्ही दिवस उपस्थित शालेय शिक्षण दर्जेदार पद्धतीने देण्यासह विविध विषयांवर महत्त्वपूर्व चर्चा

vishwatmaklokswamivarta