vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी बचाव आंदोलन यांनी धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द केला तर धारावी पुनर्विकास संघाने धारावी विभागात विकासाच्या मुद्द्यावर मिठाईवाटप करून सरकारी योजनेला पाठिंबा दिला

धारावी बचाव आंदोलन यांनी धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द केला तर धारावी पुनर्विकास संघाने धारावी विभागात विकासाच्या मुद्द्यावर मिठाईवाटप करून सरकारी योजनेला पाठिंबा दिला

 

 

मुंबई प्रतिनिधी

धारावी बचाव आंदोलन यांनी धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द केला तर धारावी पुनर्विकास संघाने धारावी विभागात 90 फूट रोड येथील गणपती मंदिराच्या प्रांगणात विकासाच्या मुद्द्यावर मिठाईवाटप करून सरकारी योजनेला पाठिंबा दिला.. यावेळी मोठ्या संख्येने धारावीकर नागरिक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते

 

या गणेशोत्सवाच्या काळात गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने धारावीच्या पुनविर्कास प्रकल्पास येणार यश मिळणार अशी ग्वाही देऊन येथील सामाजिक कार्यकर्ते धारावीकर नागरिक मोठ्या संख्येने शक्ती विनायक मंदिराच्या मंडपा जवळ जमा होऊन यावेळी मिठाई वाटप करण्यात आले . धारावीचा पुनर्वसन प्रकल्प नक्कीच पूर्ण होणार असून याकरिता धारावी पुनर्वसन संघ यांनी धारावीच्या विकासा समर्थन करून पाठिंबा दर्शविला आहे

गेले अनेक वर्षापासून धारावी विकासाच्या मुद्द्यावर राजकारण्यांकडून राजकारण करण्यात येत आहे परंतु गेले अनेक वर्षापासून धारावीकरांचे स्वतःच्या हक्काचे घराचे स्वप्न रखडत चालले होते यावेळी मात्र राज्य सरकारने केंद्र सरकार यांच्या मदतीने धारावी विकासाचे मार्ग खुले झाले असून लवकरच धारावी पुनर्वसन प्रकल्प परिपूर्ण होऊन प्रत्येकाला हक्काचे घर मिळणार आहे आणि प्रत्येकाचे धारावीतच पुनर्वसन करण्यात येणार आहे अशी ग्वाही देऊन सामाजिक कार्यकर्ते यावेळी मंदिर परिसरात धारावी 90 रोड येथे विकासाच्या मुद्द्यावर धारावी पुनर्वसन प्रकल्पाला पाठिंबा देण्यात यावा म्हणून मिठाईवाटप केले

 

याच दरम्यान सकाळी धारावी बचाव आंदोलनात यांनी धारावी विकास प्रकल्पामध्ये अनेक त्रुटी असल्याचे सांगून आंदोलन केले होते आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम मागणीसाठी डीआरपीएल प्रशासनाने रद्द केल्याचे सांगण्यात आले आहे सूत्रांची माहिती

धारावी पुनर्विकास संघ वतीने  मंदिर समोर धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावी करांना मिळणाऱ्या हक्काचे घर धारावीचा होणारा विकास याचा आनंद साजरा करण्याकरिता *मिठाई वाटप करुण तोंड गोड करण्याचा कार्यक्रम* धारावी पुनर्विकास संघ वतीने आयोजित करण्यात आला आहे.*कार्यक्रम आयोजक राजीव कुमार चौबे* यांनी केले होते सोबत समाजसेवक विकास रोकडे आणि त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

संबंधित पोस्ट

मुंबई : अंधेरी येथील पोटनिवडणूक एकत्र लढण्यावर महाविकास आघाडीचं एकमत नाही?

vishwatmaklokswamivarta

पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी: कार बनवणाऱ्या कंपनीकडून आला खुलासा, अग्रवाल कुटुंबाच्या अडचणी आणखी वाढणार

vishwatmaklokswamivarta

वीर शहीदाच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उपस्थित न राहिल्यास त्याचा पुतळा तोडणार- लोकेन्द्र साहू..

डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम राज्यातील प्रत्येक शासकीय शाळेत पोहचणार जागतिक दर्जाचे शिक्षण

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे एकत्रीकरण महाराष्ट्र दिनी उद्घाटन सोहळा संपन्न

30 मे ते 6 जून कालावधीत महिला सुरक्षेततेविषयी नवी मुंबईत पथनाट्यातून जनजागृतीचा अभिनव उपक्रम…