vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

१५ वर्षापासून प्रलंबित असलेले शेतरस्ते ‘समृद्धी’ने केले दुरुस्त स्वखर्चातून रस्ते तयार केल्याने शेतकऱ्यांनी मानले सतीश घाटगेंचे आभार….

१५ वर्षापासून प्रलंबित असलेले शेतरस्ते ‘समृद्धी’ने केले दुरुस्त स्वखर्चातून रस्ते तयार केल्याने शेतकऱ्यांनी मानले सतीश घाटगेंचे आभार….

 

जालना प्रतिनिधी: गेल्या पंधरा वर्षापासून शेकडो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला अंबड तालुक्यातील धाकलगाव ते नावडे वस्ती व घनसावंगी तालुक्यातील हरसिंग नाईक तांडा ते राणी उंचेगाव हा शेत रस्ता नादुरुस्त होता. वारंवार हे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी शेतकरी करत होते. परंतु त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. पाच वेळा स्थानिक आमदाराने या रस्त्यावर नारळ फोडले पण काम काही केले अन्ही. शेवटी समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी स्वखर्चातून हे दोन्ही रस्ते शुक्रवारी तयार करायला सुरुवात केली. यामुळे दोन्ही गावातील शेतकऱ्यांनी सतीश घाटगे यांचे आभार मानले..

 

घनसावंगी तालुक्यातील हरसिंग नाईक तांडा ते राणी उंचेगाव हा रस्ता नादुरुस्त असल्याने येथील शाळकरी मुलांना शाळेत जाता येत नव्हते. तसेच शेतकऱ्यांना शेतात जाणे जिकरीचे बनले होते. अशीच स्थिती धाकलगाव ते नावडे वस्ती या रस्त्यामुळे दाखल गाव येथील शेतकऱ्यांची होती या दोन्ही गावातील शेतकऱ्यांनी सतीश घाडगे यांची भेट घेऊन हे रस्ते दुरुस्त करून देण्याची मागणी दोन दिवसापूर्वी केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेऊन सतीश घाटगे यांनी या दोन्ही रस्त्याचे काम स्वखर्चातून सुरू केले अगोदर काम सुरू करून नंतर या रस्त्याचे उद्घाटन त्यांनी केले. यावेळी दोन्ही गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक वर्षापासूनची मागणी दोन दिवसात पूर्ण केल्यामुळे सर्व शेतकरी आनंदी झाले. त्यांनी सतीश घाटगे यांचे आभार मानले.

संबंधित पोस्ट

भारतभेटीने प्रभावित झाल्याची पॅराग्वे राष्ट्राध्यक्ष सँटियागो पेना यांची भावनापॅराग्वेच्या राष्ट्राध्यक्षांचे राजभवन येथे स्वागत-संघटित गुन्हेगारी, ड्रग माफियांचे संकट दूर करण्यासाठी पॅराग्वेला सहकार्याची अपेक्षा..

बोरा बाजार येथील रस्त्याचे”शांतीनाथ देरासर मार्ग” नामकरण करण्यात यावे-विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर

vishwatmaklokswamivarta

आणीबाणीत संविधान आणि लोकशाही मुल्यांच्या जतनासाठी सेनानींचे मोलाचे योगदान- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील आणीबाणी लढ्यातील गौरवमूर्तींना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान चित्रप्रदर्शनाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा.

vishwatmaklokswamivarta

पक्षांमध्ये असाधारण मरतूक आढळल्यास तात्काळ कळवा- जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे

दावा न केलेली रक्कम खातेदारांना देण्यासाठी बँकांनी जनजागृती करावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे- दावा न केलेली रक्कम खातेदारांना परत देण्यासाठी महामेळावा संपन्न- ⁠आतापर्यंत ३३४ खातेदारांना ३९ लाखांचा लाभ..

vishwatmaklokswamivarta