
महाराष्ट्र राज्यात 25 वर्षे वीज पुरवठा करण्याचे कंत्राट अदानी ग्रुपला…
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्रामध्ये वीजपुरवठा करण्याच्या कंत्राटासाठी लावलेली बोली अदानी ग्रुपने जिंकली आहे. ही बोली जिंकल्यामुळे अदानी ग्रुपला महाराष्ट्राला 6,600 मेगावॅट वीज पुरवण्याचे कंत्राट मिळाले आहे. असल्याची माहिती सूत्रांकडून
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने मार्च महिन्यात 5 हजार मेगावॅट सोलार विजेसाठी तसेच 1600 मेगावॅट औष्णिक वीज खरेदी करण्यासाठी विशेष निविदा काढली होती.
राज्यात वीज पुरवण्याचे कंत्राट मिळवण्यासाठी जेएसडब्ल्यू एनर्जी आणि टोरंट पॉवर या कंपन्या शर्यतीत होत्या. मात्र कमी दर लावून अदानी ग्रुपने हे कंत्राट मिळवले. अदानी ग्रुपकडून 25 वर्षांसाठी औष्णिक आणि सोलार वीजपुरवठ्यासाठी लावलेली बोली महाराष्ट्रातील सध्याच्या वीज खरेदीच्या दरापेक्षा एक रुपयाने स्वस्त आहे. कंपनीने यासाठी 4.08 रुपये प्रति युनिट बोली लावली आणि यासह या ग्रुपने जेएसडब्ल्यू एनर्जी आणि टोरेंट पॉवरला मागे टाकले.
अदानी ग्रुपला लेटर ऑफ इंटेट जारी केल्यानंतर 48 महिन्यांच्या आतमध्ये विजेचा पुरवठा सुरू करावा लागणार आहे. ही बोली जिंकली असली तरी काही नियम आणि अटी ठरल्या आहेत. त्यानुसार,अदानी ग्रुप संपूर्ण कालावधीत 2.70 रुपये प्रति युनिट दराने सौर ऊर्जा पुरवणार आहे.



