vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ग्रामपंचायतीमध्ये नल जल मित्रांची होणार नियुक्ती  –मुख्य कार्यकारी अधिकारीडॉ.भरत बास्टेवाड 

ग्रामपंचायतीमध्ये नल जल मित्रांची होणार नियुक्ती  –मुख्य कार्यकारी अधिकारीडॉ.भरत बास्टेवाड

 

 रायगड(जिमाका)द प्रतिनिधी:-जल जीवन मिशन अंतर्गत राज्यातील पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गवंडी,प्लंबर, मेकॅनिक,फिटर व इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर याप्रमाणे तीन नल जल मित्र यांची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी आपापल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी केले आहे.

 

याबाबत जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती योग्यरीतीने व्हावी. या उद्देशाने प्रति ग्रामपंचायत 3 नल जलमित्र यांची निवड करण्यात येणार आहे. तिन्ही पदांसाठी प्रत्येक पदासाठी तीन याप्रमाणे प्रति ग्राम पंचायत 9 उमेदवारांची नामनिर्देशने राज्यस्तरावर करण्यासाठी ग्रामपंचायतने त्यांची माहिती घेऊन ॲपवर भरावयाची आहेत. ग्रामपंचायतीने सादर केलेल्या नामनिर्देशनामधून राज्यस्तरावरून उमेदवारांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी निश्चित करण्यात आलेल्या कौशल्य संच पुढीलप्रमाणे आहेत. प्लंबर /गवंडी ,मोटर मेकनिक / फिटर व,इलेक्ट्रिशियन / पंप ऑपरेटर या तीन ट्रेडसाठी गावातील अनुभव असलेल्या व उचित पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे. हे कौशल्य असलेल्या उमेदवारास गावातच रोजगार उपलब्ध होणार आहे. यामधून प्रति ग्रामपंचायत कौशल्य संचसाठी एक ट्रेडसाठी एक उमेदवार प्रमाणे अंतिम 9 पैकी 3 उमेदवार निवड करण्यात येणार आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले नाव ग्रामपंचायतीस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रकल्प संचालक जल जीवन मिशन शुभांगी नाखले यांनी केले आहे.

 

0000000

संबंधित पोस्ट

समाजाच्यावरच्या अन्याय, अत्याचाराला गाडण्यासाठी पुन्हा ऐक्याची हाक  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शहरातील विविध विकास कामांची पाहणी प्रशासकीय इमारतीचे कामे करतांना आगामी 100 वर्ष टिकणारी दर्जेदार कामे करा-अजित पवार

कोल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या मुजुमदार पार्क सोसायटीतील प्रथम वर्षीय सार्वजनिक गणेशोत्सव धुमधडाक्यात…

vishwatmaklokswamivarta

कृपया प्रसिद्धीसाठी-हिंदु जनजागृती समितीची मुंबई सहपोलीस आयुक्तांकडे तक्रार खोट्या तक्रारी करून हिंदूंना जाणीवपूर्वक त्रास देणार्‍या तिस्ता सेटलवाड आणि ‘सी.जे.पी.’ संस्थेवर कारवाई करा !

vishwatmaklokswamivarta

बालसुधारगृहातील मुलींचे पलायन प्रकरण; चौकशीसाठी समिती गठीत-समितीचा अहवाल सभागृहासमोर ठेवणार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे 

vishwatmaklokswamivarta

उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीत सात पर्यटनस्थळे पुन्हा सुरु करण्याचा निर्णय, जम्मू-काश्मीरमधील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी सुरु