vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बालसुधारगृहातील मुलींचे पलायन प्रकरण; चौकशीसाठी समिती गठीत-समितीचा अहवाल सभागृहासमोर ठेवणार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे 

बालसुधारगृहातील मुलींचे पलायन प्रकरण; चौकशीसाठी समिती गठीत-समितीचा अहवाल सभागृहासमोर ठेवणार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर शहरातील एका बालसुधारगृहातील नऊ मुलींनी गच्चीवरून उड्या मारून पलायन केल्याची घटना ३० जून २०२५ रोजी घडली. या प्रकरणी चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली असून समितीचा अहवाल सात दिवसात येणार असून हा अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.विधान परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या औचित्य च्या मुद्द्यावर निवेदन करताना मंत्री तटकरे बोलत होत्या.मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, बालकल्याण समिती व इतर अधिकाऱ्यांनी १ जुलै रोजी संस्थेला भेट देत चौकशी केली. तीन मुलींनी निवास कक्षात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर आक्षेप घेत गोंधळ घातला होता. त्यानंतर बालगृहातील नऊ मुलींनी पलायनाचा प्रयत्न केला.या प्रकारानंतर सात मुलींना पोलीस व दामिनी पथकाच्या मदतीने ताब्यात घेतले, दोन मुली पळून गेल्या होत्या. त्यापैकी एक मुलगी सापडली असून एक मुलगी अद्यापही फरार आहे. पाच मुलींना पालकांच्या ताब्यात देण्यात आले असून, इतर तीन मुलींना इतर बालगृहात स्थलांतरित करण्यात आले आहे. संस्थेतील अधीक्षक बदलण्यात आला असून, बालगृह व्यवस्थापन व बालकल्याण समितीस कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. उपायुक्त बालविकास यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे, असे मंत्री तटकरे यांनी सांगितले

संबंधित पोस्ट

महिला व बाल विकास विभागात भरणार ८ हजारांवर पदे

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती कार्यशाळा

एसटीच्या टप्पा वाहतूक सेवेची १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यास मान्यता २५ जानेवारी मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्याच्या प्रगतीत बँक ऑफ इंडियाचा मोठा वाटा-जिल्हाधिकारी किशन जावळे*

मुंबई महापालिका निवडणुक प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज जाहीर-मुंबई महानगरपालिकेत दिसणार महिला राज, आरक्षण सोडतीत मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांपैकी 114 जागा महिलांसाठी राखीव…

vishwatmaklokswamivarta

चंद्रपूर जिल्हा बँकेतील सायबर चोरी प्रकरणी मुख्यमंत्र्यांची परवानगीने विशेष तपास पथकाद्वारे चौकशी- राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर