
आंबेडकरी जनतेच्या २४ वर्षे संघर्षानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला…
( सुरेश गायकवाड )मुंबई प्रतिनिधी
मुंबई- वांद्रयातील जिल्हाधिकारी कार्यालया समोरील महानगरपालिका उद्यानात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान संस्थेच्यावतीने करण्यात आली. या पुतळा उभारणीसाठी २४ वर्ष संघर्ष करावा लागला . या पुतळ्याचे अनावरणासाठी सामाजिक न्यायमंत्री रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले , काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब, स्थानिक आमदार झिशान सिद्धीकी, बाबा सिद्धीकी, माजी आमदार तृप्ती बाळा सावंत, शशिप्रभू, सचिन सावंत, वरुण सरदेसाई, शिंदे शिवसेनेचे विभागप्रमुख कृणाल सरमळकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुण तांबे, सचिव सुदेश शिर्के, सुमित वजाळे, चंद्रशेखर सकपाळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला .
विशेष म्हणजे या पुतळ्याच्या उभारणीसाठी दिवंगत शिवसेनेचे आमदार बाळा सावंत आणि जिल्हाधिकारी निधी चौहान यांनी मोलाची कामगिरी बजावली .
सुप्रसिद्ध मूर्तिकार स्वप्नीलच्या कदम यांनी हा पंचधातूचा पुतळा साकारला असून त्यांची उंची साडे तेरा फूट उंच इतकी आहे .



