vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कांदा व्यापाऱ्यांचा  सात दिवसांपासून बेमुदत संप सुरू आहे. कांदा व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम असल्यानं कांदा लिलाव बंद

कांदा व्यापाऱ्यांचा  सात दिवसांपासून बेमुदत संप सुरू आहे. कांदा व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम असल्यानं कांदा लिलाव बंद

राज्य प्रतिनिधी

कांदा व्यापाऱ्यांचा गेल्या सात दिवसांपासून बेमुदत संप सुरू आहे. कांदा व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम असल्यानं कांदा लिलाव बंद आहे. आपल्या मागणीसाठी नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी बैठकीत अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळते

गेल्या सात ते आठ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी संपावर आहेत. त्यांच्या मागण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. परंतु त्यात कोणताच तोडगा निघाला नव्हता. या बैठकीत व्यापाऱ्यांनी लिलाव बंद करू नये अशी विनंती करण्यात आली होती. परंतु जिल्ह्यातील कांदा मार्केटमध्ये लिलाव बंद कायम होती. त्यावर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी कठोर भूमिका घेत कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे गेल्या सात दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद आहेत. कांदा व्यापाऱ्यांच्या या संपामुळे शेतकऱ्यांचा कांदा चाळीत पडला आहे. त्यामुळे तो सडण्याची शक्यता मंत्री दादा भुसे यांनी वर्तवली होती. नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ बाजार समितीचे कांदा लिलाव ठप्प आहेत.

 

कांदा व्यापारी आपल्या मागणीवर ठाम असल्याने लिलाव बंद आहे. आपल्या मागणीसाठी नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी बैठकीत अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवलीय. यामुळे सरकार आता काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.

 

संबंधित पोस्ट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणिडॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र) पुरस्कार सन 2023-24 साठी अर्ज मागविले.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया 15 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते आरम्भता की ‘अरदास’गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागमनिमित्त नवी मुंबई खारघर येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करेल    -जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

Mumbai: पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीकडून मुंबईत अनेक ठिकाणी शोध मोहीम सुरु

विविध बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवी खातेदारांना परत मिळण्याकरीता बँकांशी संपर्क साधण्याचे आवाहन

नव्या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या ५१९ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता-पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक* जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण ४००.७८ कोटी* अनुसूचित जाती उपयोजना १०० कोटी* आदिवासी घटक कार्यक्रम १८.६५ कोटी

vishwatmaklokswamivarta