vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लोकसेवा हक्क अधिनियम अंमलबजावणीचा आढावा नागरिकांना लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान सेवा द्यावी-डॉ. किरण जाधव

लोकसेवा हक्क अधिनियम अंमलबजावणीचा आढावा नागरिकांना लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान सेवा द्यावी-डॉ. किरण जाधव

 

राज्य प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर, – लोकसेवा हक्क अधिनियम -2015 या कायद्याच्या अंमलबजावणीत प्रशासनाने उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून नागरिकांना गतिमान, पारदर्शक सेवा द्याव्या,असे निर्देश राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी दिले .

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, महानगरपालिकेचे अपर आयुक्त रणजित पाटील, पोलीस उपायुक्त (ग्रामीण) सुनील लांजेवार, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसिलदार सर्व विभागाचे विभाग प्रमुख या बैठकीस उपस्थित होते.

 

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ची अंमलबजावणी करण्यात येत असून नागरिकांना तात्काळ, वेळेत आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून अधिसूचित सेवांचा लाभ ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून द्यावा.या अधिनियमाची अंमलबजावणी काटेकोर पद्धतीने करावी असे आयुक्त जाधव यांनी सांगितले. एखादी सेवा नाकारत असाल तर त्या सेवा का नाकारण्यात येत आहेत याविषयीचे लेखी कारण त्यांच्या पत्रात नमूद करुन द्यावे. विविध विभागाने उत्तम कामगिरी केल्याने शून्य प्रलंबित अर्ज असल्याने या अधिकाऱ्यांचा सन्मान जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून करण्याचे सूचित करण्यात आले. सर्वच विभागाने ऑनलाइन सेवा देण्यास प्राधान्य द्यावे .कलम 20 (५)(2) अंतर्गत नागरिकांना सेवा नाकरण्याचे कारण, अपील करण्याची मुभा उपलब्ध असल्याचे लेखी कळविण्यात यावे असेही यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हास्तरीय व विभागस्तरीय विविध विभागाच्या कार्यालयप्रमुखाने सादर केल्यानंतर विभागाच्या सेवा जास्तीत जास्त अधिसूचित करून त्या ऑनलाइन देण्याचा सूचना केल्या.प्रलंबित प्रकरण बाबत वेळोवेळी विभाग प्रमुखाने आढावा घेऊन पदनिर्देशित अधिकाऱ्यांच्या बाबत योग्य त्या सूचना देण्यात आल्या. प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करून अद्यावत सेवा सुविधा नागरिकांना द्याव्यात, असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देशित केले.

 

आढावा बैठकीत सिडको, पशुसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क, आदिवासी विकास, महसूल, महिला बालविकास, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भूवैज्ञानिक कार्यालय, न्यास नोंदणी कार्यालय, सर्व तहसील कार्यालय ,पर्यटन महामंडळ, पोलीस आयुक्त कार्यालय, प्रादेशिक रेशीम संचालनालय, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक कार्यालय, भूमी अभिलेख अधीक्षक, उपायुक्त कामगार ,सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, महानगरपालिका, जिल्हा परिषद, शिक्षण ,आरोग्य, महिला बालविकास ,क्रीडा विभाग प्रदूषण नियंत्रण महामंडळ या विभागाचा आढावा सेवा हक्क आयुक्त डॉ जाधव यांनी घेतला. ज्या सेवा ऑफलाईन पद्धतीने आहेत त्या तात्काळ ऑनलाईन पद्धतीत रूपांतरित करून नागरिकांना या उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही आयुक्त जाधव यांनी केल्या आहेत.

 

0000

संबंधित पोस्ट

रविवारी साता-यात हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन वाहतूक व पार्किंग व्यवस्थेत तात्पुरते बदल..

vishwatmaklokswamivarta

आपत्ती व्यवस्थापनाच्या जनजागृतीसाठी शनिवारी मॅरेथॉन

महाराष्ट्र सदनात ‘लाईव्ह पेंटिंग’ आणि ‘कलात्मक पतंग निर्मिती’चा अनोखा उत्सव,फाईन लाईन आर्ट अकॅडमी’चा उपक्रम; कलाकुसर पाहून दिल्लीकर स्तिमित..

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील धारावी विभागामध्ये भाजपा वतीने तिरंगा यात्रा संपन्न

vishwatmaklokswamivarta

पीक कर्ज वितरण आणि स्वयंरोजगारांना अर्थसहय्य यासाठी सकारात्मक काम करा**जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे बँकांना निर्देश*

vishwatmaklokswamivarta

भरारी पथकामार्फत कृषी सेवा केंद्राची होणार तपासणी