vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवेभाजपा जिल्हा जालना च्या वतीने रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण

– माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवेभाजपा जिल्हा जालना च्या वतीने रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण

 

जालना (प्रतिनिधी) मा.श्री. रतन जी टाटा यांनी वयाचे ८६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला, रतन टाटा यांच्या निधनानंतर अवघ्या देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. भारतीय जनता पार्टी जिल्हा जालना च्या वतीने आज (दि.१०) रोजी भाजपा जिल्हा कार्यालय जालना येथे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री मा.श्री. रावसाहेब पाटील दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

माजी केंद्रीय राज्यमंत्री मा.श्री. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, रतन टाटा हे नाव भारताच्या औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तिमत्वांपैकी एक आहे. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास कर्तृत्व, नेतृत्व, आणि समाजसेवा याचा संगम होता. त्यांनी टाटा समूहाचे नेतृत्व करत असताना, भारताच्या उद्योग क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आणि अनेकांना प्रेरणा दिली. रतन जी टाटा यांनी आपल्या संपूर्ण जीवनातून उद्योगक्षेत्र आणि समाजसेवा यांचा समतोल साधत एक आदर्श उभा केला आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे टाटा समूहाने केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही मानाचे स्थान मिळवले. त्यांचे नेतृत्व, समाजसेवा आणि साधेपणा यामुळे ते कायमच आपल्यासाठी आदर्श ठरतील. रतन जी टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली…

 

यावेळी भाजपा जालना विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे, जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, प्रदेश सदस्य राजेशजी राऊत, विजय कामड, सिद्धिविनायक मुळे, धनराज काबलिये, औदुंबर बागडे, अर्जुन गेही, संध्याताई देठे, अरुणाताई जाधव, कविता नागवे, वसंतराव शिंदे, अमोल कारंजेकर, सिद्धेश्वर हाजबे, महादूआप्पा झारकंडे, आनंद झारकंडे, प्रमोद गंडाळ, संजय डोंगरे, रामलाल जाधव, दिगांबर सातपुते, मुकेश चव्हाण, गोपाल चौधरी, सोमेश काबलीये, डोंगरसिंग साबळे, सुनील खरे, सुनील पवार, रोहित नलावडे, अमन मित्तल, कृष्णा गायके, योगेश शिमगे, विकास कदम, शाम जाधव, दत्ता जाधव, उद्धव ढवळे, अतुल चव्हाण, प्रताप चौधरी, बाळू कावळे, मुरली सहारे, विष्णू राठोड, सुधाकर शिंदे, मांगीलाल पवार, हरिभाऊ पवार आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाबासाहेब पाटील कोलते

प्रसिद्धीप्रमुख, भाजपा जि.जालना

९८६०७०७५००

संबंधित पोस्ट

खामगावात लवकरच ओपन जीम आणि जॉगिंग पार्कची निर्मिती:राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांचा पुढाकार..

वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी मतदानाचा हक्क बजावला….

vishwatmaklokswamivarta

भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमूह ४ (भूकरमापक) संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता १३ आणि १४ नोव्हेंबर २०२५ रोजी ऑनलाईन परीक्षा ….

vishwatmaklokswamivarta

2022- म्हाडा भरती परीक्षेची तारीख पुन्हा बदलली नवी तारीख पहा…

vishwatmaklokswamivarta

ठाण्यातील मुंब्रा येथील घटना:घरावर दगड कोसळून 35 वर्षीय महिला ठार. 

vishwatmaklokswamivarta