
खुल्ताबाद तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता बैठक तथा विविध सेल पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रम..राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा अध्यक्ष अब्दुल रज्जाक पठाण यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न
औरंगाबाद- आज खुल्ताबाद तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता बैठक तथा विविध सेल पदाधिकारी नियुक्ती हा कार्यक्रम शासकीय विश्रामगृह खुल्ताबाद येथे पार पडला
आपल्या मातीशी, आपल्या माणसांशी, आपल्या पक्षाशी, पक्ष नेतृत्वाशी प्रामाणिक आणि निष्ठावान असलेल्या कार्यकर्त्यांची फौज असणे कोणत्याही पक्षाची ताकद असते.
सध्या राज्यात सुरू असलेल्या पक्षफोडाफोडीच्या आणि स्वार्थी राजकारणात आदरणीय पवार साहेबांच्या उत्तुंग नेतृत्वावर विश्वास ठेवत आपली मतदारसंघाच्या विकासासाठी गंगापूर आणि खुलताबाद येथील अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस( शरदचंद्र पवार) पक्षात जाहीर प्रवेश केला, यावेळी नव्याने आलेल्या पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या विविध सेलवर नियुक्ती देवून पक्षात स्वागत केलं व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अब्दुल रज्जाक, तालुकाध्यक्ष अशोक आबा खोसरे,जिल्हा उपाध्यक्ष सतिशदादा खोसरे, युवक ता अध्यक्ष शेखर भैय्या चव्हाण,अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष साजीद पठाण, शहाराध्यक्ष निसार पठाण, साजीद भाई शेख, युवक शहारध्यक्ष सलीम शेख,गुलाब पाटील,नाके कारभारी अण्णा, सांळुके पुंजाजी अण्णा,नलावडे सिताराम भांडे,सचिन बढे,अमोल शेठ भोजने, मनोज बोडखे, संदीप देव्हारे,प्रभाकर देवकर, रामेश्वर मिसाळ,खंडागळे पाटील येसगाव सह मोठया प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते
नियुक्ती करण्यात आलेले नवनिर्वाचित पदाधिकारी पुढील प्रमाणे
मच्छिंद्र पोपटराव बोडखे युवक ता कार्याध्यक्ष आखतवाडा,अल्ताफ सुल्तान पठाण अल्पसंख्याक ता कार्याध्यक्ष लोणी,राहुल देवचंद राठोड ता उपाध्यक्ष जनरल वेरुळ तांडा,दादासाहेब निकम तालुका सरचिटणीस जनरल इंदापूर,सतिश बबनराव काळे तालुका सरचिटणीस जनरल वेरुळ,आसिफ बनेखा पठाण ता उपाध्यक्ष अल्पसंख्याक चिंचोली,आरेफ शेख शहाराध्यक्ष अल्पसंख्याक खुलताबाद,योगेश नारायण बोडखे ता सरचिटणीस राष्ट्रवादी युवक चिंचोली,वाल्मीक अधाने ता उपाध्यक्ष जनरल गदाना,फिरोज पठाण अल्पसंख्याक ता सरचिटणीस रसुलपुरा,उत्कर्ष राहुल जाधव शाखाप्रमुख वेरुळ
यांची नियुक्ती करुन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारावर पाऊले ठेवत येणाऱ्या काळात एकजुटीने पक्षाची ताकद मतदारसंघात निर्माण करण्याची सुचना करण्यात आली निवडी निमित्त सत्कार करुन सर्वांचे अभिनंदन करत शुभेच्छा देण्यात आल्या.



