vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त पत्रके, भित्तीपत्रकासाठी मुद्रणावर निर्बंध

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त पत्रके, भित्तीपत्रकासाठी मुद्रणावर निर्बंध

 

 

 

राज्य प्रतिनिधी आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक- 2024 चा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रके, भित्तीपत्रके आदि मुद्रणांचे संनियंत्रणासाठी जालना जिल्ह्यातील सर्व मुद्रणालयाचे लक्ष लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 चे कलम 127-क च्या आवश्यकतेकडे वेधण्यात येत आहे. अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

कोणत्याही व्यक्तीला, निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रकाच्या दर्शनी भागावर त्याच्या मुद्रकाचे आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता नसेल असे कोणतेही मुद्रित वा प्रकाशित करता येणार नाही. निवडणुकीसाठी असणारी पत्रके, छापील साहित्य यावर प्रकाशक आणि मुद्रक यांची नावे असणे आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीला निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक ती स्वतःच त्याचा प्रकाशक आहे या बद्दलचे त्याने स्वतः स्वाक्षरी केलेले व त्यावर दोन ओळखणाऱ्या व्यक्तींनी साक्षांकित केलेले अधिकथन मुद्रकास दिल्याशिवाय मुद्रकाने मुद्रण करू नये. दिलेल्या सुचनांप्रमाणे निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक प्रकाशित करणाऱ्या व्यक्तीने कार्यवाही केल्यावर आणि मुद्रकाने मुद्रण केल्यानंतर मुद्रित साहित्याची प्रत जिल्हा निवडणुक अधिकारी जालना तसेच संबंधित निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे पाठवावी. अन्यथा संबंधित मुद्रणालयाचा परवाना रद्द करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल. या ठिकाणी निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक याचा अर्थ उमेदवाराच्या प्रचारासाठी वाटण्यात आलेले मुद्रीतपत्रक, हस्तपत्रक किंवा अन्य दस्तऐवज किवा निवडणूकीशी संबंधित असा घोषणा फलक किंवा भित्तीफलक असा होतो. जी व्यक्ती उपरोक्त निर्बंधांचे व्यतिक्रमण करील ती व्यक्ती सहा महिन्यापर्यंत असु शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास किंवा दोन हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्य दंडास किंवा दोन्ही शिक्षेस पात्र राहिल. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 लढविणारे उमेदवार, राजकीय पक्ष तसेच मुद्रणालय चालकांनी सूचनांची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी आयोगाच्या संबंधित निर्देशांचे अवलोकन करावे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

*लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा* *सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर*

vishwatmaklokswamivarta

शासन आपल्या दारी”अभियानाच्या यशस्वीततेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी उत्कृष्ट योगदान द्यावे –खासदार डॉ.श्रीकांत शिंदे ठाणे जिल्ह्यात कल्याण येथे 3 मार्च रोजी “शासन आपल्या दारी” उपक्रमाचे होणारभव्य आयोजन

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी’ व ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजनें’तर्गत ‘चौंडी ते निमगाव डाकू रस्त्या’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

दोन वयोवृद्ध महिलांवर घरात घुसून बलात्कार, २२ वर्षीय नराधमाला बेड्या

गुजरात विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सह अनेक व्हीआयपी केले मतदान…

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख -“WAVES 2025”माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला नवी दिशा..ठाणे जिल्ह्यासाठी मोठी आशा..!