vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे उदघाटन व लोकार्पण सोहळा

माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे उदघाटन व लोकार्पण सोहळा

 

राज्य प्रतिनिधी मौजे मानेगाव (खा.) ता. जि. जालना येथे माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे उदघाटन व लोकार्पण सोहळा आज  रोजी जालना विधानसभा प्रमुख मा भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते पार पडला. मानेगाव (खा.) गावासाठी सन २०२३-२४ अंतर्गत , यावेळी तांडा वस्ती योजनेंतर्गत अ. होळकर धनगर वस्ती क्र.१ येथे सी.सी. रोड व भूमिगत नाली बांधकाम करण्यासाठी ५ लक्ष्य रुपये, ९५०५ योजनेंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी १० लक्ष्य रुपये, जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी १७० लक्ष्य रुपये, DPDC योजने अंतर्गत राजाकोंडी नदीवर संरक्षण भिंत बांधकाम करण्यासाठी १० लक्ष्य रुपये व मानेगाव ते मोरंडी रस्ता मजबुतीकरण करण्यासाठी (एक किमी) १० लक्ष्य रुपये, आरपीडीएस योजना दलितवस्ती व बरड वस्ती मध्ये विद्युत वितरण (दोन ट्रान्सफार्ससह) ४० लक्ष्य रुपये, ९५०५ योजनेंतर्गत तांडा क्र. १ मध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी व तांडा क्र.२ मध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी प्रत्येकी १० लक्ष्य रुपये, दलितवस्ती योजनेंतर्गत सिमेंट रोड चे बांधकाम करण्यासाठी ७ लक्ष्य रुपये, खासदार निधी अंतर्गत तांडा क्र. १ लालदेव फाटा येथे सभागृह बांधकाम करण्यासाठी २१ लक्ष्य रुपये निधी मा रावसाहेब दादा दानवे यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर करण्यात आला होता, यावेळी या पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण करण्यात आले.

 

त्याचप्रमाणे खासदार निधी अंतर्गत दलितवस्ती मध्ये सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी १० लक्ष्य रुपये, तांडा वस्ती योजनेंतर्गत जय मल्हार वस्तीमध्ये सिमेंट रस्ता बांधकाम करण्यासाठी २५ लक्ष्य रुपये, DPDC योजनेंतर्गत शाळा दुरुस्ती करण्यासाठी १० लक्ष्य रुपये, व वाडी क्र. ३ शिवगड तांडा ९५०५ अंतर्गत मारुती मंदिर परिससरात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी १० लक्ष्य रुपये ह्या कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.

 

या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस मा सिद्धिविनायकजी मुळे, मा अनिल सरकटे, संजय डोंगरे, रामजी शेजूळ, निवृत्ती लंके, गोपाळ चौधरी, मुकेश चव्हाण, बद्री भासांडे, राजाराम राजे जाधव, शरद सोनावणे, विजू मोहिते, नारायण मोहिते, सखाराम मोहिते, अर्जुन मोहिते, सिद्धिंश्वर गोरे, पांडुरंग गायकवाड, अशोक जाधव, शंकर काळे, राजाभाऊ कालकुंभे, लसीराम राठोड, सत्यनारायण ढोबळे, दौलत भुतेकर, महादेव मोहिते, कृष्ण गायके, पांडुरंग पोहेकर, नारायण जाधव, दत्ता जाधव, सुधाकर लाखे, राजाराम वाघमारे, राधिका जाधव, ज्ञानेश्वर राठोड, भानुदास पडूळ, भानुदास मोहिते, विष्णू बिल्लोरे, अशोक पोहेकर यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

संबंधित पोस्ट

मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळनवीन योजना सुरु झाल्याचा सोशल मीडिया संदेश, कथित दलालांपासून सावधान

vishwatmaklokswamivarta

ई-पिक पाहणी करुन घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या शिफारशींवर तातडीने निर्णय घेऊन शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले 

vishwatmaklokswamivarta

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद बैठकगुणवत्ता पूर्ण दर्जेदार सेवांसाठी संयुक्त तपासणी करा- डॉ. अरविंद लोखंडे

२० जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यापार परिषद मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सचा २८ वा वर्धापन दिन…

देहू, आळंदी मिळून नवीन महानगरपालिका करण्याबाबत चाचपणी – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोहगाव येथील विविध विकासकामांचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta