vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात आज दोन नामनिर्देशन पत्र दाखल

जिल्ह्यात आज दोन नामनिर्देशन पत्र दाखल

 

गडचिरोली, प्रतिनिधी: सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 अंतर्गत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी 68-गडचिरोली (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात दोन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. डॉ. मिलिंद रामजी नारोटे (भारतीय जनता पार्टी) व डॉ. देवराव मादगुजी होळी (भारतीय जनता पार्टी) यांनी आज नामनिर्देशनपत्र दाखल केले. 67-आरमोरी (अ.ज.) व 69-अहेरी (अ.ज.) या दोन विधानसभा मतदारसंघात आज एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. तर 69-अहेरी (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात कालपर्यंत दोन अर्ज दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण चार नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.

 

आज 24 ऑक्टोबर रोजी आरमोरी विधानसभा मतदारसंघातून 6 व्यक्तींनी 16 नामनिर्देशन अर्जाची उचल केली तर गडचिरोली विधानसभा मतदार संघातून 7 व्यक्तींनी 19 अर्जाची आणि अहेरी मतदारसंघातून 6 व्यक्तींकडून 9 अर्जाची उचल करण्यात आली आहे. जिल्ह्यात तीन दिवसात एकूण 137 नामनिर्देश अर्जाची उचल झाली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे.

00000

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी #स्वदेशी उत्पादनांच्या वापराचे केलेले आवाहन तसेच #पीएमविश्वकर्मा योजनेच्या प्रसारासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत २७ आणि २८ फेब्रुवारीला छोट्या उद्योजकांच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मुंबई युथ काँग्रेसचा नवमतदार नोंदणीसाठी पुढाकार, कुलाबा येथून सुरुवात

आबासाहेबांना श्रमिकांचा लाल सलाम! अखेर निरोप देण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी..

पावसाळ्यातील तक्रारींसाठी MSRDC आणि MMRDA ने जारी केले हेल्पलाइन क्रमांक; 1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत 24×7 असणार कार्यरत

मोताळा तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिलला सोडत..

कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी-व्यक्ती,गट, संस्थानी प्रस्ताव सादर करावेत