vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

सातारा येथे सोयाबीन आधारभुत किंमत खरेदी केंद्र सुरु…

सातारा येथे सोयाबीन आधारभुत किंमत खरेदी केंद्र सुरु…

 

सातारा प्रतिनिधी : खरीप हंगाम सन २०२४-२०२५ मध्ये आधारभुत दरानुसार नाफेडमार्फत आधारभुत किंमत योजनेंतर्गत सोयाबीन खरेदी करणेकरीता खरीप हंगाम २०२४ मध्ये उत्पादीत सोयाबीन आधारभुत किंमत खरेदी योजनेअतंर्गत शेतक-यांकडुन ऑनलाईन नोंदणी करुन विक्री करणे करीता सातारा तालुका खरेदी विक्री संघ लि. मार्केट यार्ड सातारा, (संपर्क-9623495637) या संघाकडे खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले आहे, अशी माहिती सातारचे सहकारी संस्था, उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक, यांनी दिली.

ऑनलाईन नोंदणीकरीता शेतक-यांनी अद्ययावत ७/१२ उतारा, खरीप हंगाम २०२४ मध्ये सोयाबीनची पिक पाणी नोंदीसह आधारकार्ड, आधारशी लिंक असलेले बँक पासबुक झेरॉक्स इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत शेतक-यांनी खरेदी केंद्रावर सोयाबीन माल घेऊन येताना तो स्वच्छ असावा. मालाची आद्रता कमाल १२ टक्के असावी. मालामध्ये काडी कचरा माती व डाळ नसावी. सदर बाबतीत मार्गदर्शक सुचना खरेदी केंद्रावर लावण्यात आलेल्या आहेत. सदरची नोंद सोयाबीन उत्पादक शेतक-यांनी घ्यावी.

000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जगप्रसिद्ध उद्योजग इलॉन मस्क यांच्या टेस्ला कारचं देशातील पहिलं शोरुम मुंबई, ठळक अक्षरात ‘मराठी नामफलक’राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते  शोरुमचं उद्घाटन झाले

लातूर जिल्ह्यात १७४ उमेदवारांना शासकीय सेवेत नियुक्ती !शासकीय नोकरी ही समाजसेवेची संधी समजून काम करा- पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले अनुकंपा धोरणातील बदलामुळे नियुक्ती प्रक्रिया गतिमान

महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून  मुंबईत

vishwatmaklokswamivarta

वेरूळ- घृष्णेश्वर विकास आराखड्याची कामे विहित मुदतीत पूर्ण करा- अपर मुख्य सचिव बी. वेणू गोपाल रेड्डी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाकडीलयोजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याची मुदत 26 सप्टेंबर पर्यंत..

vishwatmaklokswamivarta