
झारखंडहून मुंबईत आलेल्या चाहत्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले 95 दिवसानंतर बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानला भेटण्याची संधी मिळाली….
बॉलीवूड प्रतिनिधी
किंग खान म्हणून प्रसिद्ध असलेला बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याच्या बंगल्याच्या बाहेर नेहमीच्या त्यांची गर्दी असते शाहरुख खान चाहत्या लोकांची मन्नत बांधले पश्चिम येथील बंगल्याच्या बाहेर देश-विदेशातून लोक पाहण्यासाठी येत असतात त्यात कोणाला ना कोणाला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांचे मुखदर्शन तरी होतेच असाच एक झारखंड मधून आलेला एका योगाने 95 दिवस वाट पाहून शेवटी त्याला अभिनेता शाहरुख खान ला भेटण्याची संधी मिळाली
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा 59 वा वाढदिवस होता, तिथे खुल्या आकाशाखाली शाहरुख खानचे स्टारडम पाहायला मिळाले. शाहरुख खानचे चाहते मन्नतच्या घराबाहेर त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुर होते. यामध्ये एक चाहता असाही होता जो गेल्या 95 दिवसांपासून त्याचा सर्वात आवडता अभिनेता शाहरुख खानला भेटण्याची वाट पाहत होता. झारखंडहून मुंबईत पोहोचलेल्या या चाहत्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आणि त्याला शाहरुख खानला भेटण्याची संधी मिळाली. आता या डाय हार्ड फॅन मोहम्मद अन्सारीचा शाहरुख खानसोबत हस्तांदोलन करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहरुख खानचा हा झारखंडी चाहता गेल्या 94 दिवसांपासून मन्नतच्या बाहेर ‘किंग खान’ची झलक पाहण्याची वाट पाहत होता आणि शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या दिवशी मोहम्मद अन्सारीला त्याच्या आवडत्या स्टारची झलक पाहायला मिळाली. यासह त्याची शाहरुख खानशी भेटही झाली.



