vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

बाल आणि कौटुंबिक चित्रपट श्रेणीमध्ये ‘बाफ्टा’ पुरस्कार जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी ‘बूंग’ चित्रपटाच्या टीमचे केले अभिनंदन मणिपूर आणि देशासाठी हा अभिमानाचा क्षण – पंतप्रधान

बाल आणि कौटुंबिक चित्रपट श्रेणीमध्ये ‘बाफ्टा’ पुरस्कार जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी ‘बूंग’ चित्रपटाच्या टीमचे केले अभिनंदन,मणिपूर आणि देशासाठी हा अभिमानाचा क्षण – पंतप्रधान

बॉलीवूड प्रतिनिधी-ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स (BAFTA- बाफ्टा) ने ‘ EE BAFTA’ चित्रपट पुरस्कारांमध्ये बाल आणि कौटुंबिक श्रेणीमध्ये ‘बूंग’ या मणिपुरी चित्रपटाला विजेता म्हणून घोषित केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ईई बाफ्टा’ चित्रपट पुरस्कारांमध्ये बाल आणि कौटुंबिक चित्रपट श्रेणीमध्ये पुरस्कार जिंकल्याबद्दल ‘बूंग’ चित्रपटाशी संबंधित सर्वांचे अभिनंदन केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की ही कामगिरी अत्यंत आनंददायी आहे. विशेषतः मणिपूरसाठी हा क्षण खूप आनंदाचा आहे. पंतप्रधानांनी पुढे म्हटले की,हा पुरस्कार देशातली प्रचंड सर्जनशील प्रतिभा देखील अधोरेखित करतो.

सिने पुरस्काराच्या घोषणेबद्दल ‘बाफ्टा’ च्या एक्स पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले;”या चित्रपटाशी संबंधित सर्वांचे अभिनंदन. विशेषतः मणिपूरसाठी हा खरोखरच खूप आनंदाचा क्षण आहे. यातून आपल्या देशातील अफाट सर्जनशील प्रतिभा अधोरेखित होते.

 

संबंधित पोस्ट

अभिनय जितके प्रामाणिकपणे कराल,तितके ते उत्तम होईल– अभिनेता आमिर खान

भारतकुमार’ यांना अखेरचा दंडवत!- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

दिल्लीच्या दोन दिवसीय शास्त्रीय कार्यक्रमात ‘स्वरसुधा’चा सहभाग

vishwatmaklokswamivarta

कीर्तन: रुपेरी पडद्यावर इतिहास घडवणारा भव्य चित्रपट!दिग्दर्शक अतुल जगदाळे लवकरच घोषणा करण्याच्या तयारीत!

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवस फुले शाहू आंबेडकरी जलसा आयोजनसांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजनदिनांक १९ व २० सप्टेंबर रोजी फुले शाहू आंबेडकरी विचारांचा शासनाच्या वतीने संगीतमय जागर…

vishwatmaklokswamivarta

जालना येथे ‘द पॅशन ऑफ द क्राईस्ट’ नाटकाचे भव्य आयोजन