vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

निवडणूक खर्चाचे तपशिल नोंदविण्यासाठी प्रशिक्षण

निवडणूक खर्चाचे तपशिल नोंदविण्यासाठी प्रशिक्षण

 

गडचिरोली प्रतिनिधी:- निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना त्यांचे खर्चाचे लेखे किमान तीन वेळा तपासणी करीता निवडणुक निरीक्षक (खर्च) यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने संबंधीत उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना खर्च तपशिलाच्या विविध नोंदवहया व प्रमाणके भरण्याबाबत आज प्रशिक्षण देण्यात आले.

निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्री विनीतकुमार, 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मानसी, उपविभागीय अधिकारी रणजीत यादव यावेळी उपस्थित होते.

या प्रशिक्षण कार्यक्रमात निवडणूक विषयक सादर करावयाच्या विविध नोंदवहया व प्रमाणके यांचे नमुने कोणते व कशाप्रकारे भरल्या गेले पाहिजे, याबाबत प्रात्याक्षिकाचे माध्यमातून सहायक खर्च निरीक्षक तथा अप्पर कोषागार अधिकारी दीपक उके, पथक प्रमुख (लेखा) तथा सहायक लेखाधिकारी महेश कोत्तावार यांनी समजावून सांगीतले. तसेच उपस्थित उमेदवार व त्यांचे प्राधिकृत प्रतिनीधी यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे देण्यात आली. 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघाअंतर्गत निवडणूक खर्च विषयक तपासणी दिनांक 7, 13 व 19 नोव्हेंबर रोजी नगर परीषद सभागृह देसाईगंज येथे होणार आहे. ठरलेल्या दिनांकास मुळ नोंदवहया व प्रमाणके तपासणीकरीता सादर करणेबाबत निर्देश देण्यात आले. तसेच मुळ नोंदवहया व प्रमाणके सादर न केल्यास निवडणूक आयोगाद्वारे होणारी संभाव्य कार्यवाही, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

000

संबंधित पोस्ट

पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करा,पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

मध्य प्रदेशात मोठा अपघात, पुलावर बस कोसळून 15 जण ठार तर 25 जखमी..

भिलवडी स्टेशन ते नांद्रे स्टेशन दरम्यानचा रस्ता15 ते 18 फेब्रुवारी कालावधीसाठी बंद.

vishwatmaklokswamivarta

निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ संपन्न#विधानसभानिवडणूक२०२४

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियमाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी…

vishwatmaklokswamivarta

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या  दुरुस्तीची तातडीने आवश्यकता;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी