मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघा चे बहुजन समाज पार्टी उमेदवार मनोहर रायबागे यांना वाढता जनतेचा पाठिंबा, शेतकरी कामगार पक्षाने ही दिले जाहीर समर्थन
मुंबई प्रतिनिधी
बहुचर्चित असलेल्या धारावी विधानसभा मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ.ज्योती गायकवाड निवडणूक लढवण्यासाठी प्रचार कार्य जोरात सुरू आहे तर यांच्या घराणेशाहीला विरोध करण्यासाठी तयार आहेत कार्यकर्ते पदाधिकारी आतून नाराज आहेत असल्याचेही धारावी विभागात चर्चा आहे सेना भाजपा राष्ट्रवादी रिपब्लिकन महायुतीचे उमेदवार राजेश खंदारे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे या सर्वांमध्ये बहुजन समाज पार्टीचे लोकप्रिय समाजसेवक धारावी विधानसभा उमेदवार मनोहर रायबागे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करून माटुंगा लेबर कॅम्प येथून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे यावेळी अनेक सामाजिक संघटना आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना समर्थन दिले तसेच शेतकरी कामगार पक्षाचे त्यांना समर्थन मिळालेले आहे
महाविकास आघाडीचे उमेदवार ज्योती गायकवाड यांचा प्रचार सुरू आहे तसाच प्रचार महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजेश खंदारे यांचाही प्रचार जोर धरू लागलेला आहे त्यात सर्वसामान्य सर्वांचे लाडके धारावीतील समाजसेवक बहुजन समाज पार्टीचे उमेदवार मनोहर रायबागे यांना संपूर्ण धारावीत विभागातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे गल्लोगल्ली त्यांचे स्वागत करण्यात येत असून त्यांचाही प्रचार कार्य सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून माटुंगा लेबर कॅम्प येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करून त्यांनी आपल्या प्रचार कार्याला सुरुवात केली,बहुजन समाजवादी पार्टीचे उमेदवार मनोहर रायबागे यांनी मात्र अनेक संघटनाचा पाठिंबा मिळवत आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत
माटुंगा लेबर कॅम्प येथे काल प्रचारादरम्यान त्यांना शेतकरी कामगार पक्षाचे ऍड राजेंद्र कोरडे यांनी आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. कोरडे हे धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक असून धारावी बद्दल त्यांचा अभ्यास पाहता ते रायबागे यांना निवडून आणण्यास शंभर टक्के प्रयत्न करणार असा विश्वास स्थानिकांना वाटत आहे. त्यामुळे बसपाचे उमेदवार मनोहर रायबागे यांचा विजय निश्चित मानला जात असून भावी आमदार म्हणून जनता आता त्यांच्याकडे बघत आहे.